Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हे मा माताजी! ढसा ढसा रडत दयाबेनने सांगितली व्यथा, पाहा व्हायरल व्हिडिओ

तारक मेहता फेम दयाबेन उर्फ दिशा वकानी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दिशाच्या पुनरागमनाच्या बातम्या अनेकदा आल्या, परंतु त्यात काही तथ्य नव्हते. त्याचवेळी आता सोशल मीडिया वर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिशाने आपंल दु:ख व्यक्त केलं आहे. व्हिडीओ पहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाला तर जाणून घेऊ व्हिडिओमागचं सत्य.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिशा वकाणी एका मुलाला हातात धरून बसलेली दिसत आहे. यासोबतच ती तिची व्यथा सांगता रडत असून तिच्या व्यवस्थेला दोष देत आहे. दिशाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

वास्तविक, हा व्हायरल व्हिडिओ एका चित्रपटातील असून 2008 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सी कंपनी’ (C Company)   चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात तुषार कपूर (Tushar Kapoor), मिथुन चक्रवर्ती  (Mithun Chakraborty)
आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तुषार कपूर एका पत्रकाराच्या भूमिकेत असून दिशा वाकानीची व्यथा जगासमोर मांडत आहे. एका युजरने लिहिले की, ‘आता समजले की दया भाभी कुठल्या विश्वात हरवल्या आहे’ तर दुसऱ्याने लिहिले की ‘तारक मेहता’ सिरीयलमध्ये परत या.

दिशा वाकानी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ शो मध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. दयाबेनने शोमध्ये परतावे अशीही चाहत्यांची इच्छा आहे. पण ती खरंच शोमध्ये परतणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. अभिनेत्री दिशाने चार्टर्ड अकाउंटंट मयूर वीडियासोबत लग्न केले आहे. दिशा दोन मुलांची आई असून ती आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. दिशाने 2017 मध्ये एका मुलीला जन्म दिला, तर 2022 मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सध्या अभिनेत्री आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पलक तिवारीच्या ‘या’ मादक फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, नेटकरी झाले तिच्या लुक्सवर फिदा
नवऱ्यासोबत रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केल्यानंतर का झाल्या दीपिका चिखलीया झाल्या ट्रोल? वाचा

हे देखील वाचा