Sunday, April 14, 2024

जेठालालला मिळाली नवीन दया, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये ‘ही’ अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. कार्यक्रमाची कथा आणि मांडणी यांमुळे प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमातील प्रमूख कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. यामध्ये दयाबेनच्या भूमिकेतील अभिनेत्री दिशा वकानीने कार्यक्रमात पुन्हा येण्यास नकार दिला होता. त्यामुळेच निर्मात्यांनी आता तिच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीची निवड केली आहे. 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चाहते बऱ्याच दिवसांपासून दयाबेनच्या शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. आता अलीकडेच अशा बातम्या येत आहेत की निर्मात्यांनी दयाबेनच्या पात्राची जागा शोधली आहे. रिपोर्ट्सनुसार, काजल पिसाल या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शोचे निर्माते दिशा वकानीच्या जागी नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते. या भूमिकेसाठी ऐश्वर्या सखुजा, राखी व्हिजन यांसारख्या अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती. मात्र, कोणाच्याही नावाची पुष्टी होऊ शकली नाही. बॉम्बे टाईम्समधील वृत्तानुसार, काजल पिसाल या शोमध्ये दिशा वकानीची जागा घेऊ शकते. तारक मेहता का उल्टा चष्मा या चित्रपटातील दयाबेन या अभिनेत्रीच्या नावावर निर्माते विचार करत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, जर भूमिकेसाठी काजलचे नाव फायनल झाले, तर अभिनेत्री पुढच्या महिन्यापासून शोसाठी शूटिंग सुरू करेल. काजल बडे अच्छे लगते हैं, नागिन 5 आणि साथ निभाना साथिया सारख्या शोमध्ये दिसली आहे. ऐश्वर्या सखुजानेही या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. जेव्हा ऐश्वर्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले की या बातमीत काही तथ्य आहे का? तर या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिले होते, पण मला वाटत नाही की मी ते करेन अशी तिने प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा – वरुण धवनच्या अभिनेत्रीच्या सेक्सी व्हिडिओचा राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भीगा बदन तेरा पानी में आग लगाये’

‘डार्लिंग्स’ चित्रपटातील ‘तो’ सिन व्हायरल, शेफाली शाहच्या भूमिकेने प्रेक्षकांना केले चकित

तुम्ही नोटीस केलं का? बॉलिवूडच्या ‘या’ १० कलाकारांच्या नावाची स्पेलिंग आहे जगावेगळी

हे देखील वाचा