71 व्या मिस युनिव्हर्सचा ताज USAच्या आर’बॉनी गॅब्रिएल हिने जिंकला आहे. अशातच गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स विजेती भारताची हरनाज संधू या खास प्रसंगी तिला मुकुट घालण्यासाठी मंचावर पोहोचली. त्याच मंचावर पुन्हा एकदा हरनाज भावूक झाली आणि तिला अश्रू आवरता आले नाहीत. मिस युनिव्हर्स म्हणून हरनाज संधूची ही शेवटची वाटचाल होती. यादरम्यान तिचा पाय स्टेजवर अडखळला आणि ती पडताना वाचली.
हरनाज (miss universe harnaaz sandhu) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्टेजवर येताना बॅकग्राउंडमध्ये तिच्या विषयी काही लाइन्स चालू आहे. तिच्या भाषणाच्या शेवटी ‘नमस्ते यूनिवर्स’ असे होते, जे ऐकताच तिच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. यावेळी ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये हरनाज खूपच सुंदर दिसत होती.
Hold back tears as @HarnaazKaur takes the stage one last time as Miss Universe! #MISSUNIVERSE pic.twitter.com/L0PrH0rzYw
— Miss Universe (@MissUniverse) January 15, 2023
मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी हरनाजने अनेक खिताब जिंकले आहेत. हरनाजने 2017 मध्ये ‘टाइम्स फ्रेश फेस मिस चंदीगड’, 2018 मध्ये ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार’, 2019 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया पंजाब’ जिंकली आणि आता 2021 मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकून कुटुंब आणि देशाचे नाव उंचावले आहे.
हरनाजने तिचे शालेय शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगडमधून केले आणि तिथल्याच गर्ल्स कॉलेजमधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. यासोबतच हरनाजने पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. हरनाजने ‘यारा दियां पू बरन’ आणि ‘बाई जी कुटंगे’ सारख्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.(miss universe harnaaz sandhu emotional video)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
थलापतीच्या ‘वरिसु’ चित्रपटाचा परदेशातही वाजतोय डंका, तीन दिवसातच पार केला 100 कोटींचा गल्ला
‘मला झालेला आजार शत्रूलाही होऊ नये…’, जाणून घ्या हनी सिंगला नेमकं झालंय तरी काय