हरनाज संधूने मिस युनिव्हर्ससाठी केली होती ‘अशी’ तयारी, डॉक्टर योगी अमृतराज यांनी सांगितली गुपिते


हरनाज कौर संधूच्या (Harnaaz Kaur Sandhu) मिस युनिव्हर्सचा ताज मिळवण्याच्या प्रवासात तिचे योगगुरू डॉ. योगी अमृतराज यांचे योगदान काही कमी नाही. डॉ. योगी अमृतराज हे तपोवन ऋषिकेश येथे असलेल्या मां योग आश्रमाचे संचालक आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून ते मिस इंडिया स्पर्धेतील सौंदर्यवतींना तसेच इच्छाशक्ती, आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग सत्रे देत आहेत. स्पर्धकांचे स्मित आणि सकारात्मक विचार, शरीर, मन आणि आत्मा उत्साही ठेवण्यासाठी प्रशिक्षण देतात. या मूळ मंत्रांनी त्यांनी हरनाजला सुशोभित केले. हरनाजच्या आधी त्यांनी मिस वर्ल्ड मनुषी छिल्लरलाही ट्रेन केले आहे.

पहाटे ४ वाजता उठत असे हरनाज
माध्यमांशी खास संवादात त्यांनी सांगितले की, “आमचे काम फक्त योगा करून घेणे नाही. आम्ही आसन, प्राणायाम आणि मोटीवेशनही करतो. पण त्याहीपेक्षा आम्ही लाईस्टाईल आणि खाण्याच्या सवयींवर काम करतो. कारण आपण जे अन्न खातो त्यासारखे आपले मन होते. मी हरनाजला सांगायचो की, तुला रात्री लवकर झोपावे लागेल, रात्री १० नंतर फोनवर वेळ घालवू नकोस. कृतज्ञता या विषयावर सर्वाधिक चर्चा झाली. आम्ही पप्पा, मम्मी, टीम, मुंबई शहर, मिस इंडिया टीम, स्वयंपाकी, कुत्रे यांना थँक्यू म्हणायचो. ग्रॅटिट्यूड आणि लेट गोवर काम करणे खूप महत्वाचे आहे. जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, तर तुम्ही त्याला माफ करा आणि स्वतःला हलके ठेवा.”

रात्री आनंदी झोपण्याचा दिला सल्ला
योगी अमृतराज म्हणाले, “मी हरनाजला सकाळी उठून पठण करायला सांगायचो. वाहेगुरुवर विश्वास असेल, तर वाहेगुरु जी दा खालसा वाहे गुरु जी दी फतेह म्हण. या धड्याने आम्ही दिवसाची सुरुवात करायचो. त्यानंतर मी तिला बंबल बीटचे तंत्र शिकवायचो. तसेच आम्ही ‘ऑब्जर्व द ब्रेथ’ वर ध्यान करतो. पुढे निरीक्षण करताना, आम्ही हृदयाचे निरीक्षण करणे, शरीराचे खोल निरीक्षण करणे, खुर्चीवर बसून आपले वजन निरीक्षण करणे या तंत्रांवर लक्ष केंद्रित करायचो. मी तिला रात्री शांतपणे झोपायला सांगायचो आणि तिचे ब्लेसिंग मोजायला सांगायचो. मी तिचे सर्व बोलणे ऐकून तिला आध्यात्मिक उपाय द्यायचो. मिस इंडिया असतानाही मी तिला प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर ती टॉप १२ आणि १५ मध्येही आली नाही आणि आज ती मुलगी मिस युनिव्हर्स झाली. ही किती मोठी गोष्ट आहे!”

बॉयफ्रेंडला म्हणाले डिस्ट्रॅक्शन
योगी अमृतराज म्हणाले की, “हरनाज पहाटे लवकर उठत असे. ती साधारण चार वाजता उठायची. ती उठल्याबरोबर चालायची आणि धावायची. मी ध्यान, कृतज्ञता आणि प्रतिज्ञा यावर अधिक लक्ष केंद्रित केले. शिवाय शाकाहारी जेवणाचा आग्रह धरला. हरनाज देखील अशा आहारावर होती. तिच्या आयुष्यातील दुरावा दूर करण्याचा मी प्रयत्न करायचो. मी तिला सांगितले, जर तुमचा बॉयफ्रेंड असेल, तर तोही डिस्ट्रॅक्शन होतो. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा तास आमचा योगासन असायचा.”

हरनाजसाठी नोव्हेंबर महिना होता कठीण
त्यांनी पुढे सांगितले की, “हरनाजसाठी नोव्हेंबर महिना खूप कठीण होता. त्यांचे गाऊन आणि कपडे तयार होत होते. कसे बोलावे, हसू कस असाव, मेकअपची माहिती गोळा करणे, सगळे प्रशिक्षण जोरात सुरू होते. तेव्हा ती खूप बिझी होती. तिला कळत नव्हते काय करावे? ती म्हणायची, मला स्वतःसाठी वेळ मिळत नाहीये. मग मी तिला खुश करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला सांगितले की, तुला सर्वांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. तुला आकाशाकडे पाहून आय लव्ह यू स्काय आणि आय लव्ह यू स्टार म्हणायचे आहे.”

“ती आकाशाकडे पाहून हसून ‘आय लव्ह यू स्काय’ म्हणायची आणि तणावमुक्त राहायची. मी तिला पृथ्वी मातेचे आभार मानण्याचा सल्लाही दिला. जेव्हा ती मुंबईहून दिल्लीला आणि दिल्लीहून इस्रायलला गेली तेव्हा मी तिला मुंबईला थँक्यू म्हणायला सांगितले. मी तिला दिवसातून ५०० वेळा हसायला सांगायचो आणि तिनेही माझ्या टिप्स पाळल्या. मला वाटते की, तिची कृतज्ञता, तिची शुद्धता आणि आत्मविश्वास यामुळे ती मुकुटासाठी पात्र ठरली.”

मूळची चंदिगडची आहे हरनाज
पंजाबमधील चंदीगड येथील रहिवासी असलेली हरनाज व्यवसायाने मॉडेल आहे. २१ वर्षीय हरनाजने मॉडेलिंग आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि जिंकूनही अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले. हरनाजने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. यानंतर तिने मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियाचा किताब पटकावला. ही दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर हरनाजने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला आणि त्यानंतर ती टॉप १२ मध्ये पोहोचली. मॉडेलिंगसोबतच हरनाजने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. हरनाजचे ‘यारा दियां पु बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ असे दोन पंजाबी चित्रपट आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!