Friday, March 6, 2026
Home मराठी हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘मूड बना लिया’ या गाण्यामुळे खूप चर्चेत आहे. हे गाणं नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले, ज्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अमृता यांनी स्वत: हे गाणं गायले असून या गाण्यात त्या डान्स करतानाही दिसत आहे. अशातच आता त्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

आज म्हणजेच रविवारी (दि. 15 जानेवारी)ला सर्वत्र मकरसंक्रांतची धामधूम पाहायला मिळत आहे. या निमित्ताने घराघरांत तिळगुळ, तिळाचे लाडू, असे अनेक गाेड पदार्थ बनवले जात आहेत, तर दुसरीकडे ठिकठिकाणी पतंग उडवून जल्लाेश करताना लाेक दिसत आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा करताना दिसत आहे. यादम्यान, नुकतेच अमृता फडणवीसांनी पतंग उडवतानाचा त्यांचा एक व्हिडीओ साेशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हिडिओ शेअर करत अमृता फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,“संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!” त्याबरोबर त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये  त्या पतंग उडवताना दिसत आहे. यात त्या “हॅपी मंकरसंक्रात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असा संदेशही देताना दिसत आहे.

दरम्यान, अमृता यांचा ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. या गाण्यावर साेशल मीडिया युजर्स विविध प्रतिक्रिया देतानाही दिसत आहेत. काहीजण त्यांचं कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यांना चांगलेच ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांची काही गाणी प्रदर्शित झाली होती. जी ‘मूड बना लिया’प्रमाणेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. ( amruta fadnavis wishes happy makar sankranti enjoying flying kites video viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
थलापतीच्या ‘वरिसु’ चित्रपटाचा परदेशातही वाजतोय डंका, तीन दिवसातच पार केला 100 कोटींचा गल्ला

‘मला झालेला आजार शत्रूलाही होऊ नये…’, जाणून घ्या हनी सिंगला नेमकं झालंय तरी काय

हे देखील वाचा