तेलुगु अभिनेता नानी हा त्याच्या उत्तम चित्रपटामुळे लोकप्रिय आहे. तर सध्या त्याच्या तो द पॅराडाईज या चित्रपटामुळे रीलीज पुर्वीच चर्चेत आला होता. आणि म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाने ॲडव्हान्स बुंकीग मधुन उत्तम कामगिरी केली होती. हा चित्रपट श्रीकांत ओडेला दिग्दर्शित आहे. तर या चित्रपटाने डव्हान्स बुकिंगमध्ये ४३ कोटी टप्पा ओलांडला होता. नानीच्या मागील चित्रपटांच्या ओपनिंगचे विक्रम मोडले आहेत.
हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी उपलब्ध असुन, या चित्रपटाला केंद्रिय चित्रपट प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. तर या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या ऍडव्हान्स बुकिंगबाबत पाहायचे झाल्यास 43.77 कोटीचा टप्पा ओलांडला होता ब्लाॅक केलेल्या जागा वगळता चित्रपटाने रु 36.60 कोटी कमावले हाेते. तर एकुण कमाई 43.77 कोटी झाली आहे. तसेच आता रिलीज नंतर हा चित्रपट बाॅक्स आँफिस वर किती कमाई करतो हे पाहण्यासारखे आहे.
या चित्रपटात दिग्गज कलाकार आहेत, राघव जुयाल, मोहन बाबू, कैडू लोहार आणि सोनाली (sonali)कुलकर्णी यांसारखे कलाकार हे प्रमुख भुमिकेत आहेत. या चित्रपटाला बाकीच्या राज्यांपेक्षा हैदराबाद मधुन जास्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आणि हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, स्पॅनिश आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा
बिहारमधील पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरला सोनू सूद, घटनास्थळी जाऊन केली मदत


