Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कार्तिक आर्यनने 10 दिवसाच्या शुटिंगसाठी आकारले 20 कोटींचे मानधन, चित्रपटाबद्दल सांगत म्हणाला…

बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी 2022 हे वर्ष खूपच अयशी ठरलं मात्र, या सगळ्यांपैकी फक्त एका चित्रपटाने बक्सऑफिसवर इतिहास रचला तो म्हणजे हॅंडसम हंक कार्तिक आर्यन स्टारर भुलभूलैया 2. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले असून अजूनही या चित्रपटाच्या गाण्यांवर व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकतंच कार्तिकने ‘आप की अदालत‘ या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे,ज्याचे व्हिडिओ सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्याने त्याच्या मानधनाबद्दल रक्कम सांगितली आहे जी ऐकून तुमचेही डोळे फिरतील.

लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मानात मोठं स्थान निर्माण केलं आहे. त्याशिवाय बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीमध्ये अभिनेत्याची मोजनी केली जाते. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती की, कार्तिकने कोरोना काळात राम माधवानी (Ram Madhvani) यांच्या थ्रिलर धमाका चित्रपटाच्या 10 दिवसाच्या शुटिंगसाठी अभिनेत्याने तब्बल 20 कोटीरुपये मानधन आकारले होते. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता मात्र, त्यावेळी अभिनेत्याने या गोष्टीबद्दल पुर्ण माहिती दिली नव्हती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या मानधनाबद्दल माहिती सांगितली.

कार्तिकने मुलाखतीगदरम्यान धमाका चित्रपटाच्या मानधनाबद्दल सांगितले की, “मी या चित्रपटाची शुटींग कोरोना काळात केली होती, पण काय मी माझे मानधनाची अशी चर्चा करु शकतो का? पण हा धमाका चित्रपटा असा होता ज्यामध्ये माझे शुट 10 दिवसांचेच होते. ती माझ्या मेहनतीची कामाइ होती आणि मी माझ्या प्रड्युसरचे पैसे 10 काय 20 दिवसात डबल करुन देतो. मग हे तर बनतंच ना.”

 

View this post on Instagram

 

कार्तिक पुढे म्हणाला की, “मी पहिल्यापासून स्वत:ला पहिल्या नंबरवर पाहिलं आहे, हळू हळू लोकांना देखिल ही गोष्ट माहिती झाली आणि ते देखिल मला पहिल्या नंबरवरच बघत आहेत. पण प्रेक्षकांचे प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मी त्यांच्या प्रेमासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि त्यांच्यामुळेच मी हिट चित्रपट देण्याचा प्रयत्न करतो… हिंदी चित्रपटामध्ये केवळ एकच शहजादा आहे.”

मुलाखतीदरम्यान त्याला पुढचा प्रश्न विचारला जातो की, ‘तुला दोस्ताना 2 या चित्रपटामधून का बाहेर काढलं?’ याचं उत्तर देत कार्तिक म्हणाला, “असं कधी कधी तुमच्यासोबत होतं. पण या गोष्टीबद्दल मी कधीच बोललो नाही. मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो जे मला माझ्या आईने शिकवल्या आहेत. हे आमचे संस्कार आहेत.  हे आहेत जेव्हा मोठ्यांसोबत तुमचा वाद होत असेल तर तेव्हा लहान मुले शांत होतात आणि काहीच नाही बोलत.” असं बोलत त्याने चित्रपटाबद्दल माहिती दिली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’

हे देखील वाचा