Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?

खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?

खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाशमी ही जोडी पहिल्यांचा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अनेक दिवसांपासून यांच्या ‘सेल्फी‘ चित्रपटाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या, अशातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. इमरान आणि अक्षयचा सेल्फी चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शन बॅनर खाली तयार झाला आहे.

बलिवूडमधील रोमांटिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा इमरान हाशमी (Emraan Hashmi) आणि आपल्या अ‍ॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणारर असून चित्रपटामध्ये रोमांस आणि थ्रिलरचा तडका पाहायला मिळणार आहे. सेल्फी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही कथा एका चाहत्याच्या स्वप्नावर आधारित आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दाखवले आहे की, एक बॉलिवूड सुपरस्टार आणि त्याचा एका सामान्य चाहत्यााला आपल्या आवडत्या स्टार बरोबर सेल्फी काढण्याासाठी नेमकं काय काय करतो ज्यामुळे सुपरस्टार आणि एका सामान्य फॅनमध्ये एकप्रकारचं वैर निर्माण होतं. यामधून निर्मात्याला नेमंक काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या चाहत्याला सेल्फी मिळतो की, नाही या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

 

View this post on Instagram

 

सेल्फी चित्रपटामध्ये अक्षय कुमार सुपर स्टारच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर इमरान सामान्य फॅनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये कॉमेडी ड्रामा, रोमांस आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यामध्ये सेल्फी चित्रपट पाहाण्याासठी उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटामध्ये इमरान आणि अक्षय शिवाय अभिनेत्री नुसरत भरूचा आणि डायना पेंटी या अभिनेत्री देखिल महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सेल्फी चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं असून करण जोहर (Karan Johar) आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. इमरान हाशमी आणिअक्षय कुमार स्टारर ‘सेल्फी’ चित्रपट (दि, 24 फेब्रुवारी) रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’
उफ़ तेरी अदा! मौनी रॉयच्या फोटोशूटने वढवलं तापमान, पाहाच व्हायरल फोटो

हे देखील वाचा