मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा गेल्या अनेक वर्षापसून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून चाहत्यांच्या घरातील एक अविभाज्य भाग बनला आहे. यामध्ये अनेक विनोदाचे महारथी असून चाहत्यांना पोट धरुन हसण्याला भाग पाडत असतात. या कार्यक्रमाच्या अनेक भागामध्ये कोहली फॅमिली प्रचंड प्रसिद्ध आहे. त्याशिवाय चाहत्यांनी या स्किटवर रॅप देखिल तयार केला असून अनेक चाहत्यांनी त्यावर रिल्स व्हिडिओ बनवले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच या नाटकामधील प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली परब हिने आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली परब हिने नेहमीच आपल्या धमाकेदार कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयासोबत शिवाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशातच कोहली फॅमिलीवरुन व्हायरल होणाऱ्या रॅपबद्द शिवालीला एका मुलाखतीदरम्या काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यावर उत्तर देत तिने आपली इच्छा देखिल व्यक्त केली आहे.
शिवालीने मुलाखतीदम्यान सांगितले की,” शिवाली अवली कोहली हे गाणं आम्ही बनवलं होतं. त्यामुळे त्याचा रिल आम्ही सर्वात आधी करुन टाकणार असं ठरवलं होतं. पण ते टाकेपर्यंत इतक्या लोकांनी त्यावर रिल बनवले आणि आम्हाला टॅग केले आहे. सध्या सोशल मीडियावरही ते खूप ट्रेंड होतंय. यामुळे आम्हाला खूप मज्जा येते.”
शिवाली पुढे म्हणाली क, “जर कोणी त्यावर रिल करुन टाकणार असाल तर मला टॅग करा. मी ते नक्कीच शेअर करेन. कारण ते आपल्याच स्कीट आहे. ते इतकं प्रसिद्ध होतंय तर माझी अशी खूप इच्छा आहे की ते विराट कोहलीपर्यंत नक्की पोहोचावं आणि त्यांनीही त्याची मजा घ्यावी,” अशी इच्छा देखिल तिने व्यक्त केली.”
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कोहलीफॅमिली ही प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचं असून यामधील प्रत्येक पात्राचे नावे आणि संवादाचा शेवटही ‘ली’ याच अक्षराने या स्कीटमध्ये समीर चौगुले, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि प्रियदर्शनी सारखे गाजणारे कलाकार आपली अचूक टायमिंग साधून आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवताता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणेच वाटते’, सुमित राघवनने केले मुंबई मेट्रोबद्दल ट्विट
अबब! जॅकलिन फर्नांडिसच मनमाेहक रुप, चाहते घायळ