Sunday, June 2, 2024

‘नमू वाटलेलं तुम्ही…’, म्हणत तेजस्विनी पंडितने प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराववर व्यक्त केला संताप

मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या सुंदरतेसोबतच दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.तिने चित्रपटच नाही तर बेवसिरिजमध्ये देखिल कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तेजस्वीनी नवीनच निर्मिती क्षेत्रामध्ये उतरली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीची अथांग नावाची वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री ‘बांबू’ नावाचा चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

अनेक चित्रपट आणि मालिका, बेवसिरिजमध्ये विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्वीनीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याशिवाय तिने साकारलेल्या अनेक भूमिकांचे प्रचंड कौतकही करण्यात आले. सध्या अभिनेत्री अभिनयापेक्षा जास्त निर्मिती क्षेत्रामध्ये सक्रिय दिसून येत आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता आणि कॉमेडियन प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आणि अभिनेत्री नम्रता संभेराव या दोघांवर तेजस्वीनी चिडेलेली दिसून येत आहे.

तेजस्वीनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तेजस्विनी प्रसादला “तु कसा आहे” असं विचारते त्यावर तो म्हणतो की,” तु काय प्रमोशनसाठी आली आहेस का?” त्यावर तेजस्वीनी म्हणते की, “हो अरे…” त्यानंतर ती “ए पश्या, तुझ्या टीशर्टवर बांबू लिहिलंय का?” असं विचारते. त्यावर प्रसाद म्हणतो, “नाही ते बाबू असं आहे.” त्यावर नम्रताही त्याला पाठिंबा देते. त्यानंतर नम्रता विचारते की, नमू वाटलेलं तुम्ही बांबूचं थोडं तरी प्रमोशन कराल?’ त्यावर नम्रता ‘सॉरी सॉरी’ म्हणत कपाळावरची टिकली काढते आणि प्रसादच्या टी-शर्टवर चिकटवते. त्यामुळे ‘बांबू’ लिहिते. असं म्हणते ते सगळे मिळून बांबू चित्रपाटाचं प्रमोशन करत येत्या 26 जानेवारीपासून चित्रपटगृहात असं सांगतता.

 

View this post on Instagram

 

तेजस्वीनीने निर्मित केलेल्या चित्रपटामध्ये मुख्या भूमिकेत अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) असून त्याच्या सोबत पार्थ भालेराव, समीर चौघुले, अतुल काळे, स्नेहल शिदमही आणि वैष्णवी कल्याणकर, शिवाजी साटम सारखे धमाकेदार कलाकार पाहायला मिळणार आहेत. बांबू चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केलं आसून क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडितने केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिन्मय मांडलेकरने हिंदी चित्रपटांना नकार देण्यामागचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये…’
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ज्युलियन सँड्स अमेरिकेमध्ये हायकिंग करताना बेपत्ता

हे देखील वाचा