या जगात कोणीच कोणासाठी थांबून राहत नाही असे म्हणतात, बॉलिवूड चित्रपटदेखील याला अपवाद नाहीत. २०२०च्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सगळेच चित्रपटगृह बंद आहेत. याच अनुशंगाने मार्च २०२० नंतरचे बहुतेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या चित्रपटाला तसेच अनेक वेब सीरिज बघायला ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
द बिग बुल
सन २०२१ मध्येही मालिका सुरू आहेत, आणि येत्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक महत्त्वपूर्ण चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसतील. यामध्ये अभिषेक बच्चनचा “द बिग बुल” ८ एप्रिल रोजी, डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. कुकी गुलाटी दिग्दर्शित आणि अजय देवगन निर्मित हा चित्रपट आहे. नव्वदच्या दशकात झालेल्या स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट तयार करण्यात आला असून, अभिषेक हर्षद मेहता यांच्या प्रेरणेने पात्र साकारत आहे.
या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री निकिता दत्ता महिला मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर सोहम शाह आणि सौरभ शुक्ला यांच्यासारखे कलाकार सहाय्यक भूमिकेत दिसतील. ‘द बिग बुल’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, परंतु २०२० मध्ये लॉकडाउननंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हॅलो चार्ली
‘हॅलो चार्ली’ ९ एप्रिलला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन मुख्य भूमिकेत आहे. आदर जैनचे हे डिजिटल पदार्पण आहे. ‘हॅलो चार्ली’ हा एक साहसी विनोदी चित्रपट आहे, ज्यात गोरिल्ला ‘टोटो’ मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात एलनाझ नौरोजी, जॅकी श्रॉफ आणि रघुबीर यादव देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत, तर अभिनेत्री श्लोका पंडित हीसुद्धा या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. ‘हॅलो चार्ली’ फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित आणि पंकज सारस्वत दिग्दर्शित आहे.
थंडर फोर्स
‘थंडर फोर्स’ हा सुपरहिरो कॉमेडी चित्रपटा ९ एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. बेन फाल्कोनी दिग्दर्शित या चित्रपटात मेलिसा मैककार्थी आणि ऑक्टाव्हिया स्पेंसर मुख्य भूमिकेत आहेत. यात दोन महिला सुपरहीरो पात्र आणि सुपर व्हिलन यांच्यात एक मजेदार लढाई पाहायला मिळणार आहे. आयटी चॅप्टर २ आणि गॉडझिला: किंग ऑफ मॉन्स्टर्स हे १० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-