Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल, पाहा कशी थिरकली रणबीर कपूरच्या ‘या’ गाण्यावर

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान शाहरुख खानसोबत ‘रईस‘ या चित्रपटात दिसली होती. माहिरा पाकिस्तानसाेबतच भारतातही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. याआधी ती रणबीर कपूरसोबत अमेरिकेत रस्त्याच्या कडेला स्मोकिंग करताना दिसली होती. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. मात्र, नंतर दोघांनीही या बातम्याना फेटाळून लावले. आता दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माहिरा खानने एका लग्नात जबरदस्त डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे.

अभिनेत्री माहिरा खान (mahira khan)हिने हा डान्स रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील भूत या गाण्यावर केला आहे. यावेळी माहिरा खानने लेहेंगा परिधान केला आहे, तर तिचे केस बांधलेले आहेत. परंतू, तरीदेखील अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. तिने आपल्या शानदार डान्सने सर्वांची मने जिंकली आहेत.

हा डान्स अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेता फ्रीहा अल्ताफचा मुलगा आणि गायक तुर्हान जेन्स याच्या संगीत समारंभात केला आहे. माहिरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्याचे लक्ष वेधते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)

यापूर्वी रणबीर कपूर आणि माहिरा खान जेद्दाह, सौदी अरेबिया येथे रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसले होते. दोघेही खूप सुंदर दिसत होते. दोघेही एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसले. दोघांचे बाँडिंग खूप चांगले होते. माहिरा खानने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये ‘रईस’, ‘अॅक्टर इन लाॅ’, ‘7 दिन माेहब्बत इन’ यासारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. तिने अनेक पाकिस्तानी चित्रपटांमध्येही काम केले आहे.(pakistani actress mahira khan dance video on ranbir kapoor song from film brahmastra goes viral on instagram )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आई-वडिलांच्या घटस्फोटाचे ऐकून खुश झाली होती श्रुती हासन, खुद्द अभिनेत्रीने सांगिलतंय यामागचं कारण

अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

हे देखील वाचा