Wednesday, April 17, 2024

आई-वडिलांच्या घटस्फोटाचे ऐकून खुश झाली होती श्रुती हासन, खुद्द अभिनेत्रीने सांगिलतंय यामागचं कारण

साऊथ इंडस्ट्री ते बॉलिवूड असा अभिनयाचा प्रवास करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन. साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री सारिका यांची मुलगी असलेल्या श्रुतीने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिची एक नवीन आणि तगडी ओळख निर्माण केली आहे.

सध्या श्रुती (shruti haasan) चर्चेत असण्याचे कारण म्हणजे श्रुतीने नुकतीच दिलेली एक मुलाखत. श्रुतीने एका मुलाखतीदरम्यान श्रुतीने तिच्या आई- वडिलांच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिच्या पालकांच्या जीवनातील या सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या टप्याबद्दल श्रुतीने तिचे मत आणि तिच्या या घटस्फोटाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्त केला आहे.

ती तिच्या पालकांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर खूप खुश झाली होती. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मी माझ्या आई वडिलांच्या घटस्फोटाचा निर्णय ऐकून खूपच एक्सायटेड झाली होती. आज घटस्फोटानंतर ते दोघं त्यांचे खासगी आयुष्य आनंदाने आणि समाधानाने जगत आहेत. आज मला आनंद आहे की, ते दोघं वेगळे झाले. एकत्र राहून जर आनंद मिळत नसेल, तर वेगळे होण्यात काहीच गैर नाही. जर कुणाला वेगळे व्हायचे असेल तर मला नाही वाटतं की, त्यांनी जबरदस्ती एकत्र राहावे. आज माझे आई- वडील जरी वेगळे झाले असले तरी ते एक पालक म्हणून अतिशय उत्कृष्ट आहेत. मी माझ्या आई- वडिलांच्या अतिशय जवळ आहे.”

आई वडिलांबद्दल पुढे श्रुती म्हणाली, “ते दोघं जेव्हा एकत्र होते तेव्हा ते एकमेकांच्या बरोबर चांगले नव्हते. याचा अर्थ असा नाही की, ते वैयक्तिक व्यक्ती म्हणून वाईट आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. आज ते दोघं वेगळे होऊन अधिक आनंदी आणि सुखी आहेत.”

कमल हसन आणि सारिका यांनी 1988 साली लग्न केले आणि 16 वर्षांनी म्हणजे 2004 साली त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली असून, या दोघीही मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.(shruti haasan was happy when her parents kamal haasan and sarika sepreted)

हे देखील वाचा