Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रश्मी देसाईच्या नव्या हॉट लूकची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा; सोशल मीडियावर वातावरण तापलं

रश्मी देसाई टीव्ही आणि मालिका विश्वातील एक मोठं नाव! २००८ मध्ये कलर्स वाहिनीवर आलेल्या ‘उतरन’ मालिकेमधून ही दिसली. या मालिकेमुळे रश्मीला इतकी प्रसिद्धी मिळाली की ती आजता गायत आहे. रश्मीच्या लूक मध्ये तेव्हा पासून आता पर्यंत फार बदल झालेले आहेत. तिचे बरेचसे फोटो ती इन्स्टाग्रामवर नेहमीच टाकत असते.
या फोटोजमधून आपल्याला तिच्यात झालेला हा बदल पाहायला मिळतो.

एकेकाळी अगदी साधी दिसणारी रश्मी देसाई आज आपल्याला पूर्णपणे बदललेली पाहायला मिळते. रश्मी जरी आधीच तिच्या स्टाईलबद्दल खूप सावध असली, तरी बिग बॉस १३ मध्ये सहभागी झाल्यापासून तिच्यात बराच बदल जाणवत आहे. आता सध्या ती तिच्या लूककडे जर जास्त लक्ष देताना दिसते.

उतरन या मालिकेनंतर रश्मीने आणखीन एका प्रसिद्ध मालिकेत काम केलं. दिल से दिल तक असं त्या मालिकेचं नाव होतं. या मालिकेत ती आपल्याला सिद्धार्थ शुक्लासोबत पाहायला मिळाली होती. मालिकेच्या या प्रसिद्ध जोडीने म्हणजेच सिद्धार्थ आणि रश्मी देसाई दोघांनीही बिग बॉस १३ मध्ये एकत्रच भाग घेतला होता. बिग बॉसच्या या पर्वात दोघांच्या सततच्या भांडणांमुळे दोघेही चर्चेचा विषय बनले होते.

आपल्याला माहिती आहे का की रश्मी देसाई ने टीव्ही आणि मालिका क्षेत्रात येण्यापूर्वी भोजपुरी, मणिपुरी, असामी आणि बंगाली सिनेमांमध्येही काम केलं आहे. रश्मी देसाई आता पुन्हा एकदा एका म्युजिक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटायला येणार आहे. ख्रिसमस च्या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज होणार आहे. ज्यात शाहीर शेख आणि सना सईद देखील रश्मी सोबत पाहायला मिळतील. येत्या २४ डिसेंबर रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा