Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सोमवार (दि, 6 फेब्रुरवारी ) रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या मात्र, या जोडप्याने एकदाही मीडियासमोर आपल्या नात्याची कबूली दिली नाही. यांच्यमधील जवळीक तर शेरशाह चित्रपटाच्या सेटवरच वाढली होती मात्र, असे काही सीन होते जे सिद्धार्थने बळजबरीने केले होते. त्यापैकीच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने स्वात: कियारासोबतच्या किसिंग सिनबद्दल सांगितले होते.

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवानी  (Kiara Advani) सध्या आपल्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहेत. त्याशिवाय प्रेक्षकांमध्ये देखिल या जोडप्याच्या लग्नासाठी कामालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडप्याचे जुन्या मुलाखती आणि चित्रपटामधील एकत्र सीन व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र, सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या लग्नाबद्दल मीडियाला अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अनेकांचे लक्ष यांच्या लग्नाने वेधलं आहे.

‘शेरहशाह’ चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थने लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये हजेरी लावली होती. आता कपिलचा शो म्हणल्यावर गुपित तर बाहेरच पडणारच. कपील आपल्या मस्तीखोर अंदाजात प्रत्येकच कलाकाराचे गुपित बाहेर काढत असतो तसंच कपिलने सिद्धार्थची मश्करी करत एक वैयक्तीक प्रश्न विचारला ज्यावर सिद्धार्थही गोंधळला. कपिलने विचारले की, ‘शेरशाहामध्ये एक खूपच सुंदर सीन होता, काय याची कल्पना तु स्क्रिप्टमध्येच बघितली होती का तु क्रिएटिव म्हणुन अ‍ॅड केलं होतंस? यावर सिद्धार्थ हसत म्हणाला की, “या चित्रपटामध्ये दाखवलेल्या 90 टक्के गोष्टी विक्रम बत्राच्या आयुष्यात घडलेल्याच दाखवल्या आहेत. हे ऐकताच कपिल लगेच म्हणाला की, “मी बाकीच्या 10 टक्क्या बद्दल विचारत आहे.”

 

View this post on Instagram

 

माध्यमातील वृत्तानुसार स्वत:ची प्रतिक्रिया देत सिद्धार्थ पुढे म्हणाला की, “नाही नाही, असं काही नाही काही गोष्टी असतात ज्या चित्रपटामध्ये एंटरटेनमेंट म्हणून अ‍ॅड कराव्या लगतात.” सांगायचं झालं तर शेरहशाह चित्रपटाच्या दरम्यानच सिद्धार्थ आणि कियाराच्या नात्याला सुरुवात झाली होती. यानंतर त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं आणि लवकरच ते लग्नबंधनातही अडकणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
स्टानर! ऑरेंज ड्रेसमध्ये पपया दिसतेय रकुल प्रीत, पाहाच एकदा फोटो गॅलरी
देखो पर प्यारसे! नॅशनल क्रश प्रिया वॉरियरच्या अदांनी चाहते घायाळ

हे देखील वाचा