Tuesday, March 19, 2024

काय सांगता! ‘द कपिल शर्मा शो’ला ‘या’ प्रसिद्ध हास्यकलाकाराने ठोकला रामराम

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी कपिल शर्मा त्याची संपूर्ण टीम घेऊन येतो, आणि या शोच्या माध्यमातून लोकांना त्यांचे आठवडाभराचे टेन्शन विसरायला लावून भरपूर हसवतो. मात्र लोकप्रियतेसोबतच हा शो नेहमीच अनेक वादांमध्ये अडकत असतो. कधी कपिल शर्माचे वाद, कधी कलाकारांचे वाद, कधी काय तर कधी काय. एकूणच कात तर हा शो मीडियामध्ये बहुतकरून कोणत्या वादामध्ये अडकला तर सर्वात जास्त गाजतो. या शोमध्ये आजपर्यंत अनेक कलाकार आले आणि गेले. नेहमीच कपिलने जुन्या कलाकारांच्या जागी नवीन कलाकार आणत काम चालू ठेवले. आता देखील असेच काहीसे झाले आहे.

‘द कपिल शर्मा शो’मधील एका मुख्य कलाकाराने हा शो सोडला असल्याची बातमी मिळत आहे. मागील सात वर्षांपासून ‘द कपिल शर्मा शो’ लोकांचे मनोरंजन करत आहे. मात्र सध्या चालू असलेल्या शोमधून कॉमेडियन सिद्धार्थ सागरने माघार घेत हा शो सोडला आहे. सिद्धार्थच्या या निर्णयाला कपिल शर्मा नाही तर निर्माते कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. सिद्धार्थला त्याचे मानधन वाढवून पाहिजे होते, मात्र नमते ते वाढवायला तयार नव्हते, म्हणूनच त्याने हा शो सोडला आहे. सिद्धार्थ मुंबईहून पुन्हा त्याच्या घरी देखील गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता तो पुन्हा शो मध्ये दिसणार ही आशा धूसर झाली आहे.

सिद्धार्थ सागर शोमध्ये ‘सेल्फी मावशी’, ‘उस्ताद’ घर छोड़ दास’, ‘फनवीर सिंह’ आणि ‘सागर पगलेतू’ आदी विविध भूमिका साकारत होता. सिद्धार्थचे जोक आणि त्याची भूमिका सर्वाना खूपच आवडायची. मात्र आता तो शो मध्ये दिसणार नाही. तत्पूर्वी या सर्व बातम्यांवर अजूनपर्यंत सिद्धार्थने काहीच प्रतिक्रिया दिली नसून, त्याने फक्त ‘अजून मी काहीच बोलणार नाही सध्या निर्मात्यांसोबत चर्चा चालू असल्याचे सांगितले आहे.’

सिद्धार्थ सागर आधी शोमधील कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर यांनी हा शो सोडला. यांचे देखील शो सोडण्याचे कारण त्यांचे मानधनच होते. सुनील ग्रोव्हरने देखील हा शो सोडला. मात्र त्याने कपिल आणि त्याच्यात झालेल्या वादातून हा शो सोडला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा