Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाटच वेगळा, सुर्यगड पॅलेसच्या एका रुमचं भाडं तब्बल…

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये हे जोडपं सात फेरे घेणार आहेत. त्यांच्या लग्नाची चाहत्यांनाही खूप उत्सुकता आहे. हे लग्न देखिल कॅटरिना कैफ आणि विकी कौशल सारखा रॉयल विवाह सोहळा असणार आहे. अशातच त्यांनी लग्नासाठी बुक केलेल्या सूर्यगड पॅलेसचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या पॅलेसचं एका दिवसाचं भाडं किती हेही समोर आलं आहे.

शेरशाह कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानधल्या जौसलमेरमधील सुर्यगड पॅलेसमध्ये पार पडणार असून नवरा-नवरी आणि त्यांचे कुटुंबिय लग्नासाठी रवाना झाले आहेत. 5 फेब्रुवारी पासुनच यांच्या लग्नापूपर्वीच्या कर्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या जोडप्याच्या लग्नामुळे सुर्यगड पॅलेस सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना या पॅलेसबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे. त्याशिवया यांचं भाडं किती अशा अनेकप्राकारच्या प्रशानेचं उत्तर आज तुम्हाला मिळणरा आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी त्यांच्या नातेवाइकांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली आहे. त्यामुळे यांच्या राहण्यासाठी एकूण 84 खोल्या बुक केल्या आहेत. त्याशिवाय पाहुण्यांच्या सुरक्षिततेचाही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. हा पॅलेस जैसलमेरपासून 16 किमी असून एकूण 65 एकरामध्ये पसरलेला आहे तसंच त्याचं भाडी तेवढंच मोठं आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी  लग्न करायचं असल्यास याचं भाडं 1 कोटी 20 लाख रुपये आहे तर ऑक्टोंबर ते मार्च महिन्या दरम्यान हा आकडा 2 कोटींपर्यंत जातो. सुर्यगड पॅलेसमध्ये एक खोली 250 स्क्वेअर फुट असून त्याचं एक दिवसांचं भाडं 20 ते 30 हजार रुपये आहे. तर लक्झरी रुमसाठी एका दिवसाला 40 ते 50 हाजार रुपये आकारले जातात. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी वेगवेगळ्या रुम बुक केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी सुर्यगड पॅलेस झेंडूच्या फुलांनी सजवलां आहे. त्याशिवया आलेल्या पाहुणे मंडळीच्या करमनुकीसाठी रास्थानी नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. हा लग्न सोहळा देखिल शाही थाटात रंगणार असून यामध्ये 100 ते 125 लोकांपर्यत पाहुणे मंडळी आमंत्रित असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग कश्यपने सलमान खानला दिलेला ‘तो’ सल्ला पडला होता त्याला महागात
बॉलीवूडचे हे स्टार्स दरवर्षी बॉडीगार्डवर करतात इतका खर्च, पगार ऐकून तुम्हाला बसेल धक्का

हे देखील वाचा