Thursday, June 13, 2024

विकी कौशल बनला शोस्टॉपर, फॅशन शोच्या रॅम्पवर पंजाबी गाण्यावर केला डान्स, प्रेक्षकांचा एकच जल्लाेष

विकी कौशल याने कुणाल रावलच्या लेटेस्ट एथनिक कलेक्शनसाठी रॅम्प वॉक दरम्यान काही डान्स मूव्स केल्यात. विकी या फॅशन शोचा शोस्टॉपर होता. यावेळी त्याने शेरवानी, मॅचिंग ट्राउझर्स, बूट आणि अॅक्सेसरीज परिधान केले हाेते. यावेळी अभिनेता प्रचंड सुंदर दिसत हाेता. अशातच त्याने पंजाबी गाण्यावर कुणाल रावलसाेबत डान्सही केला यावेळी प्रेक्षक जल्लोषात टाळ्या वाजवत होते. हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल झाला. चाहते या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा भरभरुण वर्षाव करत आहेत.

विकी काैशल (vicky kaushal) याच्या चाहत्यांना माहित आहे की, अभिनेत्याला पंजाबी गाणी गायला आणि त्यावर नाचताना स्वतःची मजेदार रील तयार करायला प्रचंड आवडते. गेल्या आठवड्यात एका व्हिडीओमध्ये तो ‘क्या बात है’वर थिरकताना दिसला हाेता, जे त्याची पत्नी आणि अभिनेत्री कॅटरिना कैफला आवडले नाही. त्याने त्याच्या व्हिडिओला कॅप्शन दिले, “माझी पत्नी मला असे व्हिडिओ पोस्ट करू नका अशी विनंती करते, परंतु मी तिला मदत करू शकत नाही. आशा आहे की, एक दिवस ती म्हणेल…क्या बात है!”

विकीने काही दिवसांपूर्वी कॅटरिनासाेबत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने 2021 मध्ये लग्न होईपर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवले हाेते. विकीने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, कॅटरिना कैफने त्याच्या डान्स रिहर्सल दरम्यान त्याला कसे मार्गदर्शन केले होते.

विकिला कॅटरिनासाेबत ताे त्याच्या चित्रपटांवर चर्चा करतो का? आणि ताे तिला डान्सच्या टिप्स देताे का, असे विचारले असता तो म्हणाला, “नक्कीच, मी जेव्हाही रिहर्सल करतो तेव्हा घरी परतल्यावर मी तिला रिहर्सलचा व्हिडिओ दाखवतो.” ते असे म्हणत नाहीत की, हे चांगले आहे, हे वाईट आहे. ती एक उत्तम डान्सर आहे आणि तिला सिनेमातील डान्सबद्दलही भरपूर ज्ञान आहे.”

विकि काैशल याच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ताे ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसणार आहे. (govinda naam mera actor vicky kaushal became fashion showstopper danced on tanu weds manu song sadi gali watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीने भगवी बिकिनी घालून समुद्रात लावले ठुमके; नेटकरी म्हणाले, ‘लाज वाटू दे जरा’

रेणुका शहाणेंनी समोर आणली बॉलिवूडची दुसरी बाजू; म्हणाली, ‘मी वाईट अभिनेत्री…’

हे देखील वाचा