Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आपणच गुंता वाढवायचा आणि…’ अभिनेता कुशल बद्रिकेची ‘ही’ पोस्ट झाली व्हायरल

टेलिव्हिजनवर लोकप्रिय असणारा अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावरही चांगलाच लोकप्रिय आहे. कुशलने मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर एक हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख मिळवली आहे. आज कुशल बद्रिके हे नाव जरी उच्चारले तरी चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटते. याचे कारण म्हणजे कुशलने एक विनोदी अभिनेता अशी आपल्या सर्वांच्या मनात मिळवलेली जागा. कुशल ‘चला हवा येऊ द्या’मधून नेहमीच प्रेक्षकांना भेटतो आणि त्यांना हसवतो. मात्र या हसवणाऱ्या कुशलमध्ये देखील एक नित्सिम आणि खोल विचार करणारा माणूस देखील दडला आहे. मात्र पडद्यावर आपण त्याची खळखळून हसवणारी, मजामस्ती करणारी बाजू जरी बघत असलो तरी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्यामध्ये असणाऱ्या एका वेगळ्या कुशलचे देखील दर्शन लोकांना घडवत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलच्या वेगवेगळ्या पोस्ट खूप व्हायरल होत असतात. त्याने शेअर केलेले फोटो, व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडतात. आता देखील त्याने अशीच एक सुंदर पोस्ट केली आहे. कुशलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा आणि त्याच्या मुलाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्याने जे लिहिले ते खरंच विचार करायला लावणारे तर आहेच सोबत कुशल किती विचारी आहे देखील सांगते. कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या मुलाला हे असले खेळ खूप आवडतात, त्याला Rubik’s cube भारी सोडवता येतं, तो पुन्हा पुन्हा ते shuffle करुन पुन्हा पुन्हा सोडवतो. मला खूप प्रयत्न करुन पण ते कोडं सोडवणं कधीच जमलं नाही. बर अख्ख जाऊदे, त्याची नुसती एक बाजू सुद्धा कधी clear करता आली नाही. म्हणूनच मला हे rubik’s cube, आयुष्या सारखं वाटतं .“आपणच गुंता वाढवायचा आणि आपणच सोडवत बसायचं”. मला, ना-कधी rubik’s cube सोडवता आलं, ना आयुष्य .कोडं सुटलं नाही तर खेळ सोडता येतो, आयुष्य कसं सोडायचं?”.

त्याच्या या पोस्टवर स्पृहा जोशी, स्नेहलता वसईकर आदी कलाकारांनी तर कमेंट केली सोबतच अनेकांनी त्याच्या उत्तम लिखाणाचे देखील कौतुक केले आहे. कुशल चला हवा येऊ द्या सोबतच अनेक चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

हे देखील वाचा