Sunday, May 12, 2024

मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

गुगल अनेकदा खास दिवस, खास व्यक्तीसाठी त्यांचे डुडल बदलवत त्या विशिष्ट दिवसाप्रमाणे बदलवत असते. हा मान खूपच कमी आणि खास लोकांना मिळतो. आज १० फेब्रुवारी आजच्या दिवसाचे निमित्त साधत गुगलने त्यांचे डुडल मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळवणाऱ्या पीके रोझी यांच्या रूपात ठेवले आहे. पीके रोझी यांचा जन्म १० फेब्रुवारी १९०३ रोजी तिरुवनंतपुरममध्ये झाला. खूपच कमी वयात त्यांच्यात अभिनयाची कला जन्माला आली.

त्यांनी अशा काळात काम करण्यास सुरुवात केली, जेव्हा चित्रपटांमध्ये काम करणे कमी दर्जाचे मानले जायचे. त्यातही महिलांनी काम करणे तर अतिशय मोठे पाप अथवा गुन्हा समजला जायचा. त्या काळात रोझी यांनी मल्याळम सिनेमा ‘विगाथाकुमारन’ (द लॉस्ट चाइल्ड) करत सर्व मर्यादा तोडल्या. आजच्या काळात देखील त्यांनी कहाणी आणि संघर्ष सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मात्र एवढे काम करूनही त्यांचे बाकीचे आयुष्य अंधारात गेले. त्या एवढ्या अनोळखी झाल्या की आज गुगलकडे देखील त्यांचा डुडलसाठी एक अंधुक फोटो आहे. त्यांचा एकही फोटो, व्हिडिओ नाही.

पीके रोझी या मल्याळम पहिल्या अभिनेत्री तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या दलित अभिनेत्री ठरल्या. एका सिनेमात त्यांनी नायर महिला सरोजिनी यांची भूमिका साकारली होती. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा समाजातील एका वर्गाने दलित महिलेला चित्रीकरणासाठी घेतल्यामुळे रागावला होता. त्यांच्या घराला उच्च जातीतील लोकांनी जाळून टाकले होते. पुढे त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढत तामिळनाडूकडे जाणाऱ्या एका लॉरीमध्ये प्रवेश केला. त्याच लॉरी चालकाशी त्यांनी लग्न केले आणि पुढचे जीवन ‘राजम्मल’ नावाने व्यतीत केले.

पीके रोझी कधीच प्रसिद्धीची हाव ठेवली नाही. पुढचे आयुष्य त्यांनी अभिनयापासून वेगळे होत काढले. मल्याळम सिनेमातील स्त्री अभिनेत्रींच्या एका वर्गाने त्यांच्या स्वतःच्या एका सोसायटीला पीके रोझी यांचे
नाव दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा