राखी सावंतच्या आयुष्यात सध्या प्रचंड चढ-उतार चालू आहेत. राखी सावंतने पती आदिल दुर्रानीवर अनेक आरोप केले आहेत. तिने आदिलविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, ज्यानंतर त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आता राखी सावंतने दावा केला आहे की, तिला धमक्या येत आहेत आणि गप्प राहण्यास सांगितले जात आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राखी सावंत (rakhi sawant) हिचा एक व्हिडिओ पॅपराझींनी साेशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये राखी म्हणतेय की, ‘माझा खूप छळ होत आहे. जर मी गप्प बसले नाही, तर माझे सर्व व्हिडिओ व्हायरल होतील, अशा धमक्या मला दिल्या जात आहेत.’
View this post on Instagram
राखी पुढे म्हणाली, ‘पोलिस स्टेशनकडे सर्व पुरावे आहेत. ते पुरावे अद्याप न्यायाधीशांपर्यंत पोहोचलेले नाही. मला कायदा आणि न्यायालय माहीत नाही. माझ्या वकिलाने सर्व पुरावे दिले आहेत. आदिलचे वकील जामिनासाठी वाद करत होते, पण माझ्या वकिलाने सांगितले की, ‘साहेब, एकदा तरी तुम्ही सगळे पुरावे बघा. मेडिकल सर्टिफिकेट पहा.'”
View this post on Instagram
राखीच्या वकिलाने सांगितले की, ‘आदिलच्या वकिलाने आज त्याचे बेल एप्लीकेशन दिले होते, पण पाेलिस वाल्यांना पाेलिस कस्टडी मिळाली नाही त्यामुळे अद्याप तपास झाला नाही. मात्र, आता चौकशी केली जाणार आहे. आदिलच्या जामीन अर्जावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच जामीन मिळणार की नाही हे कळेल. आज बेल मिळाली नाही.’
राखी सावंत हिने साेशल मीडियाच्या माध्यमातून आदिल दुर्रानीशी लग्न केल्याचा खुलास केला हाेता. ( TV Actress rakhi sawant adil khan durrani actress claiming that she is getting death threats)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘ये चाँद सा रौशन चेहरा’, क्रिती सेननचा क्लासी लूक पाहिलात का?
अच्छा तर ‘हे’ रहस्य आहे काजोलचे गोरे होण्यामागे, पोस्ट शेअर करत केला खुलासा