Monday, June 17, 2024

नवरा आदिल खानने दिलेल्या धोक्यामुळे राखी सावंत दुःखात, बोलताना अचानक बेशुद्ध झाली ड्रामा क्वीन

राखी सावंत मागील काही दिवसांपासून सतत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मध्ये ती तिच्या आईच्या निधनामुळे चर्चेत आली आता पुन्हा एकदा अति तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गाजत आहे. राखीच्या लग्नाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राखी आणि तिचा नवरा आदिल एकमेकांवर सतत आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहे. राखीने तिचा नवरा असलेल्या अदिलवर अनेक गंभीर आरोप लावले. सोबतच पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यानंतर त्याची चौकशी करत त्याला अटक करण्यात आली. या नात्यात तिला मिळालेला दगा तिला खूपच त्रासदायक ठरत आहे. यातच तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी मीडीयासोबत आदिलबद्दल बोलत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडते. पुढे ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या आजूबाजूच्या सर्व लोकांनी तिला उचलले. तिच्यावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न देखील सर्व करताना दिसत आहे. राखीने यावेळी सांगितले की, बिग बॉस मराठीमध्ये जाताना तिने तिच्या आईच्या उपचारासाठी आदिलला पैसे दिले होते. मात्र त्याने या पैशाचा दुरुपयोग केला. सोबतच आईच्या मृत्यूला त्याला करणीभूत ठरवले.

राखी सावंतच्या मते आदिलने राखीच्या आईच्या सर्जरीसाठी पैसे नाही दिले. याचमुळे तिच्या आईची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. याशिवाय तिने अदिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा देखील आरोप लावला. पोलिसाना तिने अदिलने तिला मारहाण केल्याचे देखील सांगितले आहे. आदिल आज (८ फेब्रुवारी) रोजी कोर्टात पेश केले जाऊ शकते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या माही श्रीवास्तवच्या ‘ननद अब हद कइली’ गाण्याने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा