Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड वर्षांनंतर रवीना टंडनने अक्षयसोबतच्या तुटलेल्या साखरपुड्याबद्दल साेडले मौन; म्हणाली, ‘तो दुसऱ्याला डेट…’

वर्षांनंतर रवीना टंडनने अक्षयसोबतच्या तुटलेल्या साखरपुड्याबद्दल साेडले मौन; म्हणाली, ‘तो दुसऱ्याला डेट…’

रवीना टंडन आणि अक्षय कुमार या जोडीने प्रेक्षकांची खूप मने जिंकली. 90 च्या दशकात अक्षय-रवीनाच्या जाेडीला चाहत्यानी डाेक्यावर घेतले हाेते. दोघांनी 1994 मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘टिप-टिप’ बरसा पानीमध्ये दोघांच्या हॉट केमिस्ट्रीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटानंतर दोघांची केवळ ऑन-स्क्रीन जोडीच सुपरहिट झाली नाही, तर ऑफ-स्क्रीनवरही त्यांची जवळीक वाढू लागली. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अशी बातमी आली होती की, दोघांनी साखरपुडा केला आहे. आता वर्षांनंतर, रवीना टंडन हिने अक्षय कुमारसोबत साखरपुडा तोडल्याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि आजही खिलाडी कुमारशी तिची बॉन्डिंग कशी आहे? हे देखील सांगितले आहे.

एका मुलाखतीत रवीना टंडन (raveena tandon) अक्षय कुमारसोबत तिची एंगेजमेंट तोडल्याबद्दल मोकळेपणाने बोली. अभिनेत्री म्हणाली, ‘या गोष्टी आजही गूगलवर उपलब्ध आहेत. त्यात असं दिसत आहे की, साखरपुड्यात जे लोक आहेत त्यांच्यात कुठलेतरी भांडण झालेले आहे. अक्षय कुमारसोबत ब्रेकअप झाल्यावर मी दुसऱ्या कोणाला डेट केले आणि तोही दुसऱ्याला डेट करत होता, मग यात ईर्षेचा मुद्दा कुठून येताे?’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी एकेकाळी अक्षय कुमारशी एंगेजमेंट केली होते हेही मी पूर्णपणे विसरली आहे. जिकडे तिकडे एंगेजमेंटची चर्चा होती, पण मी फक्त त्या बातम्यांपासून दुर राहिली.’ तिच्या आणि अक्षय कुमारच्या बाँडिंगबद्दल बोलताना रवीना टंडन म्हणाली, ‘जेव्हा आम्ही मोहरा चित्रपटाचे शूटिंग केले तेव्हा आमची जोडी सुपरहिट झाली. आजही आम्ही एकमेकांना पब्लिकली भेटतो तेव्हा छान भेटतो. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे जातात. घटस्फोट झाला तरी ते पुढे जातात, त्यात मोठी गोष्ट काय आहे? मीही माझ्या आयुष्याच्या या चॅप्टरमधून पुढे गेली आहे.’

रवीना अक्षयच्या जोडीने नेहमीच रुपेरी पडद्यावर धमाल केली आहे. ‘मोहरा’ व्यतिरिक्त ही सुपरहिट जोडी ‘बारूद’, ‘दावा’ आणि’ खिलाडी का खिलाडी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.(bollywood actress raveena tandon break her silence on broken engagement with actor akshay kumar actress says i already move on many years back)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

लग्नानंतरही मंगळसुत्र अन् सिंदूरमध्ये दिसली नाही अथिया; युजर्स म्हणाले, ‘हिचे नक्की लग्न… ‘

हे देखील वाचा