Thursday, March 30, 2023

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

माध्यमातील वृत्तांनुसार, राजकुमार हिरानी लाला अमरनाथ यांच्यावर बायोपिक चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात लाला अमरनाथ यांची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी अक्षय कुमारची निवड केली आहे. राजकुमार हिरानी 2019 पासून या चित्रपटावर काम करत आहेत. त्यांनी आपल्या लेखकांना या चित्रपटाची पटकथा लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.

शाहरुखचा ‘डंकी’ रिलीज झाल्यानंतर ते या चित्रपटावर काम सुरू करतील. ते त्यांच्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे. मात्र, आतापर्यंत अक्षय कुमार (akshy kumar) किंवा दिग्दर्शक राजकुमार हिरानी (rajkumar hiranai) यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

अष्टपैलू क्रिकेटर हाेते लाला अमरनाथ
लाला अमरनाथ (lala amarnath ) यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पंजाबमध्ये झाला होता. कसोटी पदार्पणातच त्यांनी शतक झळकावले. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे ते पहिले खेळाडू ठरले. ते स्वतंत्र भारताचे पहिले क्रिकेट कर्णधार होते आणि त्यांनी 1952 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. लाला अमरनाथ हे अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मात्र, 2000 साली त्यांचे दु:खद निधन झाले.

अक्षय साकारणार लाला अमरनाथ यांची भूमिका?
अक्षयला क्रिकेटपटूच्या भूमिकेत पाहणे खूप आनंददायी ठरेल. मात्र, याआधी त्याने 2011 मध्ये आलेल्या ‘पटियाला हाऊस’ चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने भारतीय वंशाच्या ब्रिटिश क्रिकेटरची भूमिका साकारली होती. अशात आता अक्षय या भूमिकेत बसतो की, नाही हे पाहणे रंजक ठरेल. तसेच अभिनेता प्रथमच  दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणार आहे.अक्षयने 2016 मध्ये आलेल्या सुशांत सिंग राजपूत स्टारर ‘एमएस धोनी’ या चित्रपटात क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण दिग्दर्शक नीरज पांडेने त्याला हे पात्र साकारण्यास नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार याच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, त्याचा ‘सेल्फी’ हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात  प्रदर्शित होत आहे. याव्यतिरिक्त अभिनेता ‘कॅप्सूल गिल’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(rajkumar hiranai making lala amarnath biopic)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिषेक पाठक अन् शिवालिका ओबेरॉय अडकेल विवाह बंधनात, पाहा व्हिडिओ

जया बच्चन यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्याकडे दाखवले बोट, राज्यसभेच्या कामकाजादरम्यान घडली घटना

हे देखील वाचा