‘बिग बॉस 16‘ चा विजेता एमसी स्टॅन चाहत्यांमध्ये माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. टीव्हीच्या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोचा भाग बनून स्टॅनच्या लोकप्रियतेते दुप्पट वाढ झाली आहे. अलीकडे इंस्टाग्रामवर रॅपरने शाहरुख खानलाही मागे टाकून आश्चर्यकारक रेकॉर्ड बनवला आहे.
लाइव्ह स्ट्रीमच्या टाॅप 10 यादीत एमसी स्टॅनचा प्रवेश
बिग बॉस 16 (big boss 16) मधून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅन (mc stan) याने गुरुवारी (दि. 16 फेब्रुवारी) राेजी प्रथमच चाहत्यांशी संवाद साधला. त्याने इंस्टाग्रामवर थेट लाइव सेशन केले, जिथे 508k हून अधिक लोक काही वेळात सामील झाले. यावेळी स्टॅनने इतिहास रचला. स्टेन हा भारतातील पहिला सेलिब्रिटी बनला आहे, ज्यांच्या लाईव्ह सेशनला 508k हजार व्ह्यूज मिळाले आहेत. एमसी स्टॅनपुर्वी, हा पुरस्कार शाहरुख खानकडे होता. स्टॅनने इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिलेल्या लाइव्ह स्ट्रीमच्या टॉप 10 यादीत प्रवेश केला आहे.
विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनच्या फीमध्ये 30 ते 40 टक्के वाढ
इंस्टाग्रामवर इतके व्ह्यूज मिळाल्यानंतर चाहत्यांना आता एमसी स्टॅनच्या इन्स्टा कमाईबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. माध्यमातील वृत्तांनुसार,एमसी स्टॅन इंस्टावर रील बनवण्यासाठी 18-23 लाख रुपये आकारतो. त्याचबरोबर ताे इन्स्टा स्टोरीसाठी 5 ते 7 लाख रुपये घेताे. मात्र, इतके पैसे ताे बिग बॉस 16मध्ये येण्यापूर्वी घेत असे. आता विजेता झाल्यानंतर त्याच्या फीमध्ये 30 ते 40 टक्के वाढ होणार आहे.
View this post on Instagram
शिव ठाकरे ठरला ‘बिग बाॅस 16’चा प्रथम उपविजेता
रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस 16’ च्या विजेत्याची ट्रॉफी उंचवली, तर त्याचा मित्र शिव ठाकरे प्रथम उपविजेता म्हणून उदयास आला आणि प्रियांका चहर चौधरी सीझनची दुसरी उपविजेती म्हणून उदयास आली.(mc stan surprising instagram earning after he breaks pathaan actor shah rukh khan record during insta live )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जब वी मेट’चा शो चालू असताना अचानक चित्रपटगृहात शाहिद कपूरने मारली एन्ट्री आणि…
‘अभिनेता म्हणून तू काय आहेस?’, समीर चौगुले यांनी लिहिली प्रसाद ओकसाठी ‘ती’ पोस्ट