Thursday, April 18, 2024

‘शाहरुख खानला जिवंंत जाळेल’, अयोध्याच्या महंत परमहंसांची कॅमेऱ्यासमोर ‘किंग खान’ला धमकी

किंग खान‘ हे बिरुद मिरवणाऱ्या शाहरुख खान याच्या ‘पठाण सिनेमामुळे सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. या सिनेमाविषयी अनेक राजकारणी आणि चाहते आपापली मते मांडत आहेत. अशात आता ‘अयोध्याचे संत’ म्हटल्या जाणाऱ्या महंत परमहंस आचार्य यांनी शाहरुखविषयी खळबळजनक भाष्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा रंगली आहे. चला तर परमहंस काय म्हणालेत जाणून घेऊया…

काय म्हणाले आचार्य?
महंत परमहंस आचार्य (Mahatn Paramhans Acharya) यांनी थेट म्हटले आहे की, जर ते शाहरुखला भेटले, तर त्याला जिवंत जाळल्याशिवाय राहणार नाहीत. यासोबतच त्यांनी ‘बेशरम रंग’ गाण्यात भगव्या रंगाचा अपमान झाल्याचे म्हटले आहे.

पुढे बोलताना आचार्य म्हणाले की, “आमचे सनातन धर्मीय लोक याचा सातत्याने विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहे. जर मला शाहरुख भेटला, तर मी त्यालाही जिवंत जाळून टाकेल.” ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ते असेही म्हणाले की, “जर पठाण सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला, तर ते चित्रपटगृहांनाही आग लावून टाकतील.”

आचार्य यांनी ‘पठाण’ सिनेमा बॉयकॉट करण्याबाबतही वक्तव्य केले. यापूर्वी अयोध्येच्या हनुमान गढीचे पुजारी महंत राजू दास यांनीही सिनेमाचा विरोध केला होता. त्यांनी शाहरुखवर सनातन धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीही सनातन धर्माच्या भावना दुखावत आहे. शाहरुखची भूमिका ही नेहमीच सनातन धर्माच्या संस्कृतीची थट्टा उडवणारी राहिली आहे.

यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनीही आचार्यांना वादग्रस्त वक्तव्यासाठी अटक करण्याची मागणी केली आहे.

‘बेशरम रंग’ गाण्यावरून वादाला सुरुवात
खरं तर, 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या गाण्यावर अश्लीलता पसरवल्याचे आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचे म्हटले जात आहे. अशात 25 जानेवारी, 2023 रोजी जेव्हा सिनेमा रिलीज होईल, तेव्हा सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (pathaan controversy mahant paramhans acharya warning actor shah rukh khan to kill burn alive)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तमन्ना भाटियाने शेअर केला खासगी जेटमधील फोटो, चाहत्यांनी विचारले ‘मागे विराट कोहली काय करतोय?’
‘जेलमधल्या कैदीसारखी दिसतेस’, मुलानेच उडवली मलायकाच्या स्टायलिश कपड्यांची खिल्ली

हे देखील वाचा