मराठी मनोरंजनविश्वातील खासकरून टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध आणि अमाप लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने अनेक मालिकांमधून काम केले, मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे. या मालिकेनंतर तेजश्रीला घराघरात ओळख मिळाली. आज तेजश्रीला ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये उत्तमोत्तम केले. सोबतच ती काही चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील झळकली. यासर्वांसोबतच ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. ती सतत तिचे सोशल मीडिया अपडेट करताना दिसते.
View this post on Instagram
आज तेजश्री चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तेजश्रीने केलेली एक पोस्ट. नुकतीच तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “तुला तुझ्या स्वत:बद्दल अभिमान बाळगायला हवा, कारण तू तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ एकटीने घालवला आहेस. जेव्हा इतर सर्वांना तू सामान्य आहेस, असे वाटत होते”. या कॅप्शनसोबत तिने तिचा एका ठिकाणी केंद्रित झालेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सामान्य आणि नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
तेजश्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्याचा सपाटा लावला आहे. तिने असे का लिहिले असे अनेक प्रश्न विचारत ते तिला कमेंट्स करत आहे. काहींनी तिला ती एक प्रेरणा असल्याचे देखील सांगितले. तेजश्रीबद्दल सांगायचे झाले तर ‘होणार सून…’ नंतर ती ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोबत झळकली होती. सध्या तेजश्री कुठेच दिसत नसल्याने अनेकांना तिच्या नवीन प्रोजेक्टची अशा आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी
‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर