Tuesday, June 18, 2024

‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

टेलिव्हिजनविश्वातील तारक मेहता का उलटा चश्मा हा शो सध्या चांगलाच गाजत आहे. सतत शो सोडणाऱ्या कलाकरांमुळे चर्चेत येणाऱ्या शोमध्ये नुकतीच नवीन टप्पूची एन्ट्री झाली आणि शोबद्दल बऱ्याच दिवसांनी सकारात्मक बातमी समोर आली. मधल्या काही काळामध्ये सतत या मालिकेवर विविध आरोप केले जात होते. अनेक मोठ्या कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे मालिका सतत वादात होती. मात्र नवीन टप्पूची एन्ट्री शोमध्ये झाली आणि एकदम वातावरणच बदल. सर्व नकारात्मक बाबी सकारात्मक झाल्या. शोमध्ये अनेक नवनवीन कलाकार आले असून, आता फक्त सर्वाना त्यांच्या लाडक्या दया भाभीची आस आहे. कधी एकदा दया भाभी शोमध्ये येतील असे झाले आहे. त्यातच आता दया भाभी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दया भाभी अर्थात दिशा वाकाणी यांनी २०१७ साली त्यांच्या प्रेग्नन्सीमुळे हा शो सोडला. त्यानंतर त्या येणार असे सांगितले जात होते, मात्र मधेच बातमी आली की त्यांनी दुसऱ्या बाळाला देखील जन्म दिला आहे. मग आता दयाबेन पुन्हा कधी येणार? हा एकच प्रश्न सध्या मालिकेच्या निर्मात्यांना विचारला जात आहे. सध्या दिशा वाकाणी या त्यांच्या कुटुंबासोबत एन्जॉय करत आहे. आपल्या मुलांना वेळ देत त्या त्यांचे संगोपन करत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये दिशा वाकाणी या त्यांचे पती मयूर पारीख आणि दोघं मुलांसोबत दिसत आहे. त्या एका मंदिरात असून, भगवान शंकराची पूजा करत आहे. या व्हिडिओ कदाचित महाशिवरात्रीच्या वेळेचा असावा असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये त्या मोठ्या भक्तिभावाने देवाची आराधना करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकाऱ्यानी त्यावर कमेंट्स करत दिशा वाकाणी यांना पुन्हा शोमध्ये येण्याची विनंती केली आहे. काहींनी तर त्यांना त्यांची आणि जेठालालची जोडी मिस करत असल्याचे सांगितले तर काहींनी त्यांचा डान्स गरबा मिस करत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या निर्मात्यांकडून दिशा यांना पुन्हा शोमध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न चालू आहे. मात्र त्या पुन्हा शो मध्ये कधी दिसतील हे अजून स्पष्ट झालेले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

हे देखील वाचा