कलाकार हे पब्लिक फिगर असतात. सतत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सगळ्यांमध्ये होते. शिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला देखील सर्वांना आवडते. त्यामुळे पापराझी सतत कलाकारांवर त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून लक्ष ठेऊनच असतात. यामुळे अनेकदा कलाकारांचे खासगी व्हिडिओ, फोटो सर्रास व्हायरल होताना आपण बघतो. मात्र यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यात दखल दिल्यासारखे होते. नुकतेच आलिया भट्टच्या बाबतीत असे झाले. तिचे कोणीतरी बाल्कनीमधून फोटो घेऊन छापले आणि त्यावर आलिया भट्टने आपत्तीची दर्शवली होती. याबाबत अभिनेत्री यामी गौतमने देखील तिचा अनुभव सांगितला आहे.
आलिया भट्टने नुकतेच तिच्या सहमतीशिवाय फोटो काढण्यावर आपत्ती दर्शवली होती. तिच्या या मतावर बॉलिवूडमधून देखील पाठिंबा मिळाला होता. यात आता यामी गौतमचे देखील नाव जोडले गेले आहे. तिने तिच्याबाबतीत असच एक घडलेला प्रकार सांगितला आहे. एका फॅनने फोटो काढण्याच्या नावाखाली तिचा एक व्हिडिओ केला होता.
View this post on Instagram
एका माहितीनुसार यामीने सांगितले की, एकदा तिच्या फार्ममध्ये एक मुलगा आला होता. तरुण होता जवळपास १९-२० वर्षाचा त्याने तिच्या स्टाफला विनंती केली की त्याला तिला भेटायचे. त्याला तिच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे. मात्र तो व्हिडिओ बनवत होता. याची पुसटशी कल्पना देखील यामीला नव्हती. तो व्हिडिओ खूपच वाईट होता. या व्हिडिओला त्या मुलाने त्याच्या व्लॉगवर शेअर केले होते. त्याच्या या व्हिडिओ मिलियन्स व्ह्यूज होते. पुढे यामी म्हणाली, “अशा व्हिडिओवर कमेंट्स आल्यावर लोकांना वाटते की मला कमेंट्स मिळाल्या. मात्र असा चुकीचा व्यवहार दुसऱ्यांना दाखवतो की ते देखील असे काहीही करू शकतात. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा आहे. आणि अशी हरकत ठीक नाही.
यामी गौतमच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास नुकतीच तिची ‘लॉस्ट’ही सिरीज प्रदर्शित झाली आहे. यासोबतच ती ‘ओह माय गॉड २’ आणि चोर निकल के भागा’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस
‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो