Friday, June 14, 2024

‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो

मराठी सिनेसृष्टीला उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना असलेली मानसी नाईक मधल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. मानसी लवकरच तिचा नवरा असलेल्या प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असून, सध्या याची प्रक्रिया सुरु आहे. मीडियामध्ये खूप आधीपासूनच मानसी आणि प्रदीपमध्ये आलबेल नसल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र दोघांकडून कधीच याबाबत काही आले नाही. नंतर खुद्द मानसीने ते वेगळे होत असल्याचे जाहीर केले. पण आता मानसी या सगळ्यांमध्ये खूप पुढे गेली आहे. तिने तिचे आयुष्य पुन्हा एकदा नावाने जगण्यास सुरुवात केली असून, ती सोशल मीडियावर देखील अनेक सकारात्मक पोस्ट टाकताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

आता देखील पुन्हा मानसी तिच्या अशाच एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. मानसीने इंस्टाग्रामवर तिचे काही साडीतले फोटो पोस्ट केले असून, या फोटोना दिलेले कॅप्शन सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे. मानसीने या फोटोंमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसलेली असून, हातात हिरवा चुडा घातलेला दिसत आहे. हे होतो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “नाही. माझ्या आयुष्याची ही नवीन सुरुवात नाही. ही नव्या पुस्तकाची सुरुवात आहे. पहिले पुस्तक कधीच बंद केले आहे आणि समुद्रात फेकले आहे. आता मी हे नवीन पुस्तक उघडले आहे. नुकतीच सुरुवात झाली आहे”. आता तिच्या या पोस्टमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मानसीने हे फोटोशूट समुद्राच्या किनारी केले असून, त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. तत्पूर्वी तिने जानेवारी २०२१ मध्ये बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर ते अनेकदा सोबत दिसले त्यांचे अनेक रील्स व्हायरल देखील झाले होते. मात्र मधेच माशी शिंकली आणि त्यांच्यात दरी निर्माण झाली. सध्या मानसी या सर्व गोष्टींमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबई सोडण्यापूर्वी ऋतिकने पॅपराझींसमाेर साबा आझादला केले किस, व्हिडिओ व्हायरल

‘ड्रामाक्विन’ शिकवणार अभिनय? राखीने अकादमीसाठी उचलले माेठे पाऊल, एकदा व्हिडिओ पाहाच

 

हे देखील वाचा