Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड एनएसडीमधून रिजेक्ट झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या मनोज बाजपेयींच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार

एनएसडीमधून रिजेक्ट झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या मनोज बाजपेयींच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार

मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या आगामी ‘गुलमोहर’ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन तो करत असून त्याच्या या सिनेमाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये त्याने नैराश्याबद्दल चर्चा केली आणि हे कसे कमी केले जाऊ शकते ते सांगितले. त्यांनी सांगितले की, नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून रिजेक्ट झाल्यानंतर त्यांनी ही बाब खूपच मनाला लावून घेतली होती. लहानपणापासून अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मनोज यांना हा नकार पचनी पडत नव्हता. 

मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, “त्यांना पाचवीनंतर ठरवून टाकले होते की, त्यांना अभिनेता व्हायचे आहे. एकदा वर्गात त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता वाचली होती, त्यानंतर त्यांचे खूपच कौतुक झाले. कविता वाचून झाल्यानंतर मी मनातल्या मनात संकल्प केला की मला अभिनयात जायचे. मी माझ्या डोक्यात पक्के केले की, शाळेनंतर मला नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये जायचे आहे. मी त्यादृष्टीने तयारी देखील सुरु केली होती. अनेक वर्ष गेली आणि मनोज हे एमबीबीएसची परीक्षा नापास झाले तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितले की मी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करायला दिल्लीला जात आहे. मात्र मी एनसीडीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी दिल्लीला जात होतो. तिथे जेव्हा ऍडमिशन मिळाले नाही तेव्हा मी हताश झालो. मला वाटायचे की सर्वच दरवाजे बंद झाले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Krish Khatri (@krishkhatriofficial)

मनोज बाजपेयी यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा मी एनएसडीमध्ये गेलो त्या तीन वर्षांमध्ये मी खूपच अनुभवी झालो होतो. मात्र तरीही मला रिजेक्ट केले गेले. त्यानंतर पुढचा एक महिना खूप वाईट गेला. सर्वच हातातून निघून गेल्याचे वाटत होते. कारण माझ्याकडे कोणताच प्लॅन बी नव्हता. नवीन काहीतरी सुरु करायचे असे ठरवत असताना मंडी हाऊसमध्ये एनएसडीमधील जुने विद्यार्थी एक ड्रामा ग्रुप ३६५ दिवस एक वर्कशॉप चालवायचा. ज्यात मी सहभाग घेतला. मी तिथे खूप काही शिकलो.”

पुढे मनोज बाजपेयी यांनी मोठा खुलासा करत सांगितले की, नैराश्यामुळे त्यांच्या डोक्यात आत्महत्येचे देखील विचार येत होते. नैराश्यमधील लोकांसाठी हे विचार अजिबात असामान्य नसतात. मात्र या अनेक गोष्टींवर त्यांनी मत केली आणि जे समोर येईल ते काम केले. आज बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते म्हणून मनोज बाजपेयी यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा