Thursday, December 19, 2024
[aioseo_breadcrumbs]

अंबाबाईच्या मंदिरात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घातला गोंधळ, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

मराठी मनोरंजनक्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. सोनालीने तिच्या अभिनयाने, तिच्या नृत्याने आणि सौंदर्याने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीला देखील आकर्षित केले आहे. मात्र सोनाली सध्या तिच्या एका शोमुळे चांगलीच गाजत आहे. महाराष्ट्र टुरिझमचा कार्यक्रम असणाऱ्या ‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’ हा तिचा शो खूपच लोकप्रिय झाला आहे. या शोच्या माध्यमातून ती सध्या राज्यातील विविध शहरांना भेटी देऊन त्या शहराच्या संस्कृतीविषयी, पर्यटनाविषयी, खाद्यसंस्कृतीविषयी आदी अनेक गोष्टींबद्दल लोकांना माहिती करून देत आहे.

‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’ या शोच्या माध्यमातून ती आपल्या राज्याबद्दल आपल्यासोबतच इतर लोकांना माहिती देत पर्यटनासाठी प्रोत्साहन करताना दिसत आहे. या शोमुळे तिने आतापर्यंत कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर आदी शहरांना भेट दिली असून, हे सर्व भाग यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. आता लवकरच ती अमरावती मध्ये मजा करताना दिसणार आहे. सध्या ती या शोचे अमरावतीत शूटिंग करत असून, याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अमरावती म्हटले की, सर्वात आधी डोक्यात येते ती अंबाबाईचे मंदिर. अमरावती शहराचे सर्वात मोठे आणि पहिले आकर्षण म्हणजे अंबाबाई मंदिर. नुकताच सोनालीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अंबाबाईच्या मंदिरासमोर सोनाली गोंधळामध्ये नाचताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना…”, तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले सोबतच अमरावतीमध्ये आलेल्या सोनालीला ती अजून त्या शहरात काय काय बघू शकते, करू शकते हे देखील सांगितले आहे.

सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून, ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. सोनालीने ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ आदी अनेक चित्रपटात काम केले असून, ती काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून आज तिचे नाव घेतले जाते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा