एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अक्षय कुमार याचा अभिनय असलेला महेश मांजरेकर यांचा वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी मराठी सिनेमाच्या शुटींगदरम्यान मोठा अपघात झाला आहे. ( Accident in Kolhapur during the shooting of Marathi director Mahesh Manjrekar Film Vedant Marathe Veer Daudale Saat )
कोल्हापुरातील पन्हाळगडावर या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना हा अपघात झाला. यावेळी फोटोग्राफी करत असलेला नाहेश खोबरे हा तरुण थेट 100 फूट खोल दरीत कोसळला. या घटनेनंतर तिथे एकच गोंधळ माजला. उपस्थितांना तत्काळ त्याला वर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 19 वर्षीय नागेश खोबरे या अपघातात गंभीररित्या जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूरात शूटींग सुरु आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. त्याच्यासोबतच जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. ( Accident in Kolhapur during the shooting of Marathi director Mahesh Manjrekar Film Vedant Marathe Veer Daudale Saat )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Birthday Special : ग्लॅमरच्या जगापासून निवृत्ती घेतलेल्या तनुश्री दत्ताचा ‘असा’ आहे चित्रपटसृष्टीतील प्रवास
– चित्रपटांपासून दूर असलेल्या श्वेताने सांगितला बालपणीचा ‘ताे’ किस्सा; म्हणाली, ‘मेकअप रूममध्ये…’