मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डीजे अजेक्स उर्फ अक्षय कुमार हा उडीसामधील लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र १८ मार्च शनिवार रोजी डीजे अजेक्स हा त्याच्या भुवनेश्वरमधील घरात रहस्यमयी प्रकारे मृत आढळला आहे. त्याला त्याच्या घरातील लोकांनी फाशी घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि लगेच त्याला खाली उतरवत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डीजे अजेक्सचा घरीच मृत्यू झाला होता.
View this post on Instagram
डीजे अजेक्सच्या कुटुंबातील लोकांनी उडीसा येथील स्थानिक चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार डीजे अजेक्सने खारवेल येथील त्याच्या घरात चादरीच्या साहाय्याने फाशी घेत आत्महत्या केली. डीजे अजेक्सला घरातील लोकांनी त्याच्या रूममध्ये जाताना पाहिले होते. खूप रात्री झाली तरी तो बाहेर आला नाही, म्हणून १० वाजेच्या आसपास घरातील लोकांनी त्याच्या रूमचा दरवाजा वाजवला, मात्र काहीच प्रतिसाद आला नाही, मग पुढे त्याच्या रूमचा दरवाजा तोडला आणि त्यांना दिसले की, त्याने फाशी घेतली होती.
डीजे अजेक्सला लहेच कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान डीजे अजेक्स हा मागील दहा पेक्षा जास्त वर्षांपासून डीजे म्हणून काम करत होता. इंस्टाग्रामवर त्याचे ९० हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तत्पूर्वी डीजे अजेक्सच्या बॉडीला सध्या राजधानी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला असून, अजूनही त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी देखील त्यांच्या तपासाला सुरुवात केली असून, सध्या ये चौकशी करत आहे.
View this post on Instagram
डीजे अजेक्सचा सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या राहुलने दावा केला आहे की, त्याच्या मृत्यूचे कारण प्रेमाचा त्रिकोण आहे. त्याने आरोप केला की, डीजे अजेक्सची गर्लफ्रेंड असणाऱ्या मुलीचे दुसऱ्या मुलासोबत अफेयर चालू होते. दोघं मिळून डीजे अजेक्सला ब्लॅकमेल देखील करत होते. यामुळे डीजे अजेक्स तणावामध्ये असल्याचे देखील राहुलने पोलिसाना चौकशीमध्ये सांगितले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुभव सिन्हा यांच्या सांगण्यावरून आशुतोष राणा यांनी रागाच्या भरात राजकुमाराला लगावली होती चापट
‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा