Monday, September 14, 2026
Home बॉलीवूड अरिजित सिंग-श्रेया घोषालच्या सुरांनी सजलं जय जय राम, रणबीर कपुरच्या रामायण मधील पहिलं गाणं रिलीज

अरिजित सिंग-श्रेया घोषालच्या सुरांनी सजलं जय जय राम, रणबीर कपुरच्या रामायण मधील पहिलं गाणं रिलीज

रामायण हा चित्रपट या वर्षातील एक बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. आणि या चित्रपटसाठी प्रेक्षक वर्ग आतुर आहे. आणि आता निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. रामायणच्या संगीत मोहिमेचा शुभारंभ करत चित्रपटतील पहिले गाणे जय जय राम प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले असुन त्याचे गीत डाॅ. कुमार विश्वास यांनी लिहले आहे. गाण्याच्या प्रदर्शनामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. 

रामायण चित्रपटाच्या संगीत मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी निर्मात्यांनी गणेश चतुर्थीच्या विशेष प्रसंगाची विशेष प्रसंगाची निवड केली. चित्रपटाचे सिया राम पोस्टरचे अनावरण 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता करण्यात आले. त्यानंतर लगेचच जय जय रामचे अनावरण करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कार्यची सुरुवात शुभ होण्यासाठी गणपती बाप्पच्या आर्शीवादाने झाली आहे.

रामायण (ramayan)चित्रपटातील जय जय राम हे गाणे त्याच्या संगीत आणि गायकांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. ए. आर. रहमान यांनी हे गाणे संगीतबध्द केले आहे. तर डाॅ. कुमार विश्वास यांनी त्याचे गीत लिहिले आहे. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजाने या गाण्याला एक वेगळी ओळख दिली आहे.

रामायण हा चित्रपट नमित मल्होत्रा निर्मित असुन हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळीच्या मुहूर्तावर 6 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरात रिलीज होणार आहे. तर भारतात हा चित्रपट 8 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. आणि याचा दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा

सलमान खानच्या आगामी मातृभूमी चित्रपटाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या प्रदर्शनाची तारीख

हे देखील वाचा