Tuesday, February 3, 2026
Home कॅलेंडर बाबो.!! बॉलिवूड कलाकारांच्या पाळीव प्राण्याच्या किंमती ऐकूण शॉक लागेल; एका प्राण्याचं तर इन्स्टाग्रामवर अकाऊंट

बाबो.!! बॉलिवूड कलाकारांच्या पाळीव प्राण्याच्या किंमती ऐकूण शॉक लागेल; एका प्राण्याचं तर इन्स्टाग्रामवर अकाऊंट

आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेण्यास सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. अनेक बॉलीवूड कलाकार त्यांच्या महागड्या लाईफस्टाईलमुळे सर्वत्र चर्चेत असतात. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युलमधून घरी आल्यानंतर पाळी् प्राण्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते. आणि ते त्यांच्यावर ती अगदी लाखोंमध्ये खर्च करतात.

कलाकार त्यांच्या या प्राण्यांना खूप माया लावतात. आज आपण जाणून घेऊयाच बॉलिवूडमधल्या काही अशा कलाकारांबद्दल, ज्यांनी त्यांच्या प्राण्यांसाठी खूप पैसे खर्च केले आहेत.

बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्या परिवारात शानौक नावाचा एक पाळीव कुत्रा होता. हा कुत्रा ग्रेड डेन या प्रजातीचा होता. या कुत्र्याला बिग बी यांनी 2006 मध्ये खरेदी केले आहे. त्यानंतर त्या कुत्र्याचे 2013 मध्ये निधन झाले. या कुत्र्याची किंमत 50 हजार पासून ते 1 लाखापर्यंत आहे. त्याचे पालन करण्यासाठी महिन्याला 10 हजार रुपये एवढा खर्च येतो.

बॉलिवूडमधील दबंग खान सलमान खानजवळ दोन फ्रेंच डॉग आहेत. त्यांचे नाव मायसन आणि मायजन हे आहेत. या दोघांच्या मृत्यूनंतर सलमान खानने मेहबूब स्टुडिओमध्ये दोघांचे पुतळे उभे केले आहेत. या कुत्र्याची किंमत 63 हजार एवढी आहे.

शाहरुख खानला‌ आधीपासूनच पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. शाहरुखकडे डॅश नावाचा एक कुत्रा होता. ज्याचे निधन 2015 मध्ये झाले. या कुत्र्याची किंमत 40-50 हजार आहे. या शिवाय त्याच्याकडे एक लॅब्रोडर आणि दोन मल्टीन डॉग आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला देखील पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे एक क्यूट डॉग आहे. ज्याचं नावं शैंपेन हे आहे. या सोबतच तिच्याकडे दोन मांजरी आहेत. या मांजरीची किंमत 40 हजार आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने 2020 मध्ये पांडा नावाचा एक डॉग दत्तक घेतला आहे. हा डॉग तिने निक जोनस याला गिफ्ट केला होता. या शिवाय तिच्याकडे एक डायना नावाचा डॉग आहे. ती तिच्या या डॉगला खूप महागडे आणि डिझायनर कपडे घालत असते. तिने तिचे इंस्टाग्रामवर एक अकाउंट देखील ओपन केले आहे.

हे देखील वाचा