बॉलिवूडमधील एक प्रतिभावान आणि गुणी अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्माला ओळखले जाते. तिने तिच्या कामाने आणि मेहनतीने कोणत्याही पाठिंब्याशिवाय या क्षेत्रात आपले स्थान तयार केले. अभिनयासोबतच अनुष्का सतत तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील गाजत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमीच प्रकाशझोतात असते. मात्र सध्या ती तिच्या सेल्स टॅक्समुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काने सेल्स टॅक्स विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणामुळे ती गाजत आहे.
प्राप्त माहितीनुसार अनुष्का शर्मा सेल्स टॅक्स नोटीस प्रकरणात मुंबई हाय कोर्टात सुनावणी झाली आहे. न्यायमूर्ती नितिन जामदार आणि न्यायमूर्ती अभय आहूजा यांच्या पीठाने अनुष्काच्या मुद्द्यांना अनुचित सांगितले आहे. कोर्टाने अनुष्काच्या याचिकांना फेटाळत चार आठवड्यांच्या आत विक्री कर उपायुक्त यांच्यासमोर तिचे अपील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच कोर्टाने हे देखील म्हटले आहे की, जर मध्यस्तींची सवलत आहे तर थेट हाय कोर्टात का आले? तत्पूर्वी अनुष्का शर्माने कोर्टात महाराष्ट्र मूल्य वर्धित कर कलमाच्या अंतर्गत २०१२ पासून २०१६ च्या दरम्यान असलेल्या विक्री कर उपायुक्तांच्या चार आदेशांन विरोधात आव्हान दिले होते. जे मूल्यांकन वर्षांसाठी टॅक्स मागण्याच्या संबंधित होते.
या प्रकरणात अनुष्का शर्माच्या विरोधात जाऊन विक्री कर विभागाने त्यांची तक्रारीत मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, अनुष्का शर्मा पुरस्कार सोहळे किंवा स्टेजवरील तिच्या परफॉर्मन्ससाठी पहिली मालकीण होती. यासाठीच यातून तिची जी कमाई होते त्यावर जो टॅक्स बसतो ते भरणे तिचे कर्तव्य आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक
ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…