Monday, December 9, 2024
Home अन्य सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

मागच्या वर्षी अगदी दणक्यात प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियन सेल्वन-1’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हाच सांगितले गेले होते की, ‘पोन्नियन सेल्वन’ सिनेमाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित केला जाईल. सिनेमाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून, लवकरच हा दुसरा भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याआधी फिल्म ‘पोन्नियन सेल्वन-2’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

‘पोन्नियन सेल्वन 2’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार याची माहिती अभिनेत्री ऐश्वर्या रायने सोशल मीडियावरून आधीच दिली होती. तिने पोस्ट शेअर केल्यानंतर हा सिनेमा ट्रेंडिंगमध्ये होता. या सिनेमाच्या ट्रेलरची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात होती. प्रेक्षकांच्या मोठ्या मागणीमुळे हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘पोन्नियन सेल्वन 2’ सिनेमाचा ट्रेलर LYCA प्रोडक्शन या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या सिनेमाच्या आधारावरूनच पुढचा दुसरा भाग चालू होणार आहे.

सोबतच ‘पोन्नियन सेल्वन 2’ च्या भव्य ट्रेलरनंतर हा अंदाज लावता येऊ शकतो की सत्तेसाठी सिंहासनाची महायुद्ध देखील होऊ शकते. ट्रेलरवरून तर हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता दुप्पट वाढवणार हे नक्की. ‘पोन्नियन सेल्वन 2’ हा सिनेमा नक्कीच तुफान गाजणार हे नक्की. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.

‘पोन्नियन सेल्वन 2’ सिनेमाचा ट्रेलर पाहून आता सर्वांनाच सिनेमाची जोरदार प्रतीक्षा पाहिली जाते. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पीएस 2 हा सिनेमा पुढच्या महिन्यात २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे. याआधी ‘पोन्नियन सेल्वन 1’ हा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा