स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चांगलीच गाजली आहे. मालिकेतील सगळेच पात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगवली आहेत. मालिका केवळ एका कोणत्याही पात्राला मध्यवर्ती न ठेवता सगळ्याचा पात्रांना समान महत्व दिले आहे. मालिकेत मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत आहे. अशात मालिकेतील अरुंधतीचे पात्र साकारणारी मधुराणी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (madhurani prabhulkar) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. यामध्ये अभिनेत्री म्हणते की, “स्त्री ही जन्माला येत नाही तिला घडवलं जातं. आपल्या संस्कारत ती घडवली जाते, समाज विविध पद्धतीने स्त्रीला घडवत असतो. समाज किंवा आपली संस्था, परंपराच ठरवते की, स्त्रियांनी अमुक पद्धतीने वागायला नाही पाहिजे टमूक पद्धतीने वागयला नाही पाहिजे. असं असेल तरच ती स्त्री याेग्य मानली जाते”.
View this post on Instagram
“तिने वर तोंड करुन बाेलता कामा नये, तिने उलट उत्तर देऊ नये किंवा तिने प्रश्न विचारुन चालणार नाही. यासाेबतच ती वडील, भाऊ, नवरा किंवा कुटुंबातील इतर पुरुषांच्या एक पाऊल मागेच असली पाहिजे, तिने प्रगती हाेऊ नये असं समाजच ठरवताे. काही ठिकाणी, तर यशस्वी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोनही विकृत आहे”. मधुराणीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते. सिमोन दि बोव्हा या फ्रेंच विचारवंत लेखिकेच्या ‘The Second Sex’ ह्या पुस्तकातलं सर्वात महत्त्वाचं हे वाक्य. स्त्री विषयी बोलताना या ओळीच्या उल्लेखानेच सुरुवात होऊ शकते. विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हे वाचायलाच हवं”. अभिनेत्रीच्या या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करत आहेत. (marathi actress madhurani prabhulkar talk about women rights watch full video)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पायाला पट्टी बांधलेली असतानाही विराट कोहली थिरकला शाहरुख खानसोबत, व्हिडिओ व्हायरल
आनंदाची बातमी! टेलिव्हिजनविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता होणार बाबा, हटके पद्धतीने शेअर केली गोड बातमी