Monday, July 1, 2024

रामायणाच्या ‘या’ भागाने लॉकडाऊनमध्ये रचला इतिहास, अभिनेते सुनील लहरी यांनी ट्विट करत म्हटले…

रामानंद सागर यांचे नाव घेतले की लगेच डोळ्यासमोर ‘रामायण’ हीच मालिका उभी राहते. या मालिकेने अमाप आपण विचार करू शकतो, त्याच्याही पलीकडे जात लोकप्रियता मिळवली. आजही तीन दशकांपेक्षा अधिक काळ होऊनही या मालिकेबद्दल बोलले जाते. हीच या मालिकेच्या लोकप्रियतेची पावती आहे. या मालिकेला ९० च्या दशकात प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद नक्कीच अगणित होता, मात्र दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात जेव्हा हेच ‘रामायण’ पुन्हा प्रक्षेपित करण्यात आले तेव्हा देखील याला लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

याचा पुन्हा प्रक्षेपित झालेल्या रामायणाची आठवण अभिनेते सुनील लहरी यांनी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. पुन्हा दाखवल्या गेलेल्या रामायणाच्या देखील लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी या मालिकेने वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. या घटनेला आज तीन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या अभिनेते सुनील लहरी यांनी एक खास ट्विट केले आहे.

सुनील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “आजच्या दिवशी १६ एप्रिल २०२० रोजी ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मण-मेघनाद यांच्या प्रक्षेपित झालेल्या युद्धाच्या भागाने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. हा टेलिव्हिजन विश्वातील एक मैलाचा दगड ठरला. ७७.७ कोटी प्रेक्षकांनी हा भाग पाहिला होता. तुम्हा सगळ्यांचे आभार. हे सर्व तुम्हा सर्वांमुळेच शक्य झाले आहे.” यासोबतच त्यांनी या भागाचे युद्धाचे काही फोटो देखील पोस्ट केले आहे.

दरम्यान रामानंद सागर यांचे ‘रामायण’ २५ जानेवारी १९८७ साली सुरु झाले होते आणि त्याचा शेवटचा भाग ३१ जुलै १९८८ साली पाहायला मिळाला. या मालिकेने कलाकारांना कायमस्वरूपी ओळख मिळवून दिली. मालिकेत काम करणाऱ्या राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांना लोकं प्रत्यक्षात देव समजू लागले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मग मी भारत का सोडू?” म्हणत आमिर खानने दिले त्याच्या ‘त्या’ विवादित व्यक्तव्यावर स्पष्टीकरण

‘हे कठोर शासन नाही, अराजकता’ अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करने साधला सरकारवर निशाणा

हे देखील वाचा