Sunday, July 14, 2024

पायल मलिक ‘बिग बॉस OTT 3’ मधून बाहेर, सोशल मीडियावर चाहत्यांनी केला संताप व्यक्त

21 जूनपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये स्पर्धकांना शोमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शोची प्रसिद्ध स्पर्धक आणि अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे आणि अशा प्रकारे ती शोमधून बाहेर काढलेली दुसरी स्पर्धक बनली आहे.

रविवारी जेव्हा इव्हिकेशन एपिसोड सुरू झाला तेव्हा बिग बॉसच्या १५ घरातील सदस्यांनी सात स्पर्धकांना घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले. त्याचवेळी सातपैकी दोन जणांना साई केतन रावने वाचवले. या दोन स्पर्धकांमध्ये अरमान मलिक आणि दीपक चौरसिया यांचा समावेश होता. यानंतर पायल मलिकला घराबाहेर पडण्याची घोषणा करण्यात आली.

पायल मलिक बाहेर पडताच प्रेक्षकांमध्ये एक जुना मुद्दा चर्चिला जाऊ लागला.अरमान मलिक आणि पायल मलिक म्हणाले होते की, कृतिकाने बिग बॉसची विजेती व्हावी अशी त्यांची दोघांची इच्छा आहे. त्याचवेळी अरमानने सांगितले होते की, त्याला दोन्ही पत्नींना फायनलमध्ये घेऊन जायचे आहे. कृतिका ही अरमान मलिकची दुसरी पत्नी आहे आणि अरमान आणि पायलने शोच्या सुरुवातीला अनिल कपूरसोबत असे सांगितले होते.

पायलच्या बाहेर पडल्याने काही सोशल मीडिया यूजर्स नाराज आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “पायल हे डिसर्व करत नाही” आणखी एका यूजरने लिहिले की, “कृपया पायलला परत आणा.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “बिग बॉस तुम्ही चुकीचे केले. पायल छान खेळत होती. त्यावर बिग बॉसचे लक्ष होते.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फ्लाईटमध्ये घाबरले होते राम गोपाल वर्मा; कोरिओग्राफर म्हणाले, ‘तुझे मृत वडील येथे आहेत’
सैफ अली खान गुप्त अकाऊंटवरून सोशल मीडियावर ठेवतो लक्ष! दूर राहण्यामागे आहे हे कारण

हे देखील वाचा