Wednesday, January 15, 2025
Home मराठी तुफान गाजणाऱ्या ‘या’ नाटकाने घेतला प्रेक्षकांचा निरोप, सुनील बर्वे यांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

तुफान गाजणाऱ्या ‘या’ नाटकाने घेतला प्रेक्षकांचा निरोप, सुनील बर्वे यांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

मराठी मनोरंजनविश्वात नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. नाटकांचा प्रेक्षक मोठा आणि वेगळा आहे. या नाटकांनी देखील काळानुसार, वेळेनुसार स्वतःमध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असे बदल घडवून आणले आणि त्यांच्या मनावर राज्य केले. एखादे नाटक सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांनी जर नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला, तर त्या नाटकाचे संपूर्ण जगभरात असंख्य प्रयोग होतात. नाटक किती जरी चांगले आले तरी कधी ना कधी ते संपणार हे सर्वांनाच माहित असते.

आज एखादे नाटक सुरु झाले तर त्याचे कितीही यशस्वी प्रयोग केले तरी बंद तर होणार असतेच. अतिशय जड अंतःकरणाने कलाकार देखील आपल्या या नाटकाला निरोप देतात. आजच्या सोशल मीडियाच्या काळात कलाकार पोस्ट शेअर करत याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. नुकतेच ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. याच पार्श्वभूमीवर अभिनेते सुनील बर्वे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Barve (@sunilbarve)

सुनील बर्वे यांनी त्यांच्या पोस्टमधून नाटकाबद्दल लिहिताना अभिनेत्री पर्ण पेठेबद्दल देखील लिहीत तिचे आभार मानले आहे. सुनील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “काल ‘अमर फोटो स्टुडिओ’ ह्या आमच्या नाटकाचा बोरिवलीतील शेवटचा प्रयोग होता, तसाच तो पर्ण पेठेचा ही शेवटचा प्रयोग होता. सखी शिकायला परदेशी गेल्यानंतर पर्ण प्रयोग करायला लागली, सखी परत आल्यावर दोघी आलटून पालटून प्रयोग करत राहिल्या. नंतर आठ नऊ महिने प्रयोगच झाले नाहीत, दरम्यान पर्णने चारचौघी नाटक घेतलं, आणि ते धुंवाधार चालू लागलं. अमर… चे शेवटचे काही प्रयोग करायचे ठरवल्यावर तिला प्रयोग करणं शक्य होत नव्हतं म्हणून आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटंत होतं, पण as luck would have it कालचा प्रयोग करणं तिला शक्य झालं आणि तो तिचा अमर फोटो स्टुडिओ चा शेवटचा प्रयोग ठरला.

सखी ऐवजी ती प्रयोग करण्याचं ठरलं तेव्हासुद्धा आम्ही तीचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतिने केलं, म्हणूनच तिच्या शेवटच्या प्रयोगाला सुद्धा आगळे वेगळेपणा टिकवून ठेवला!

पर्ण, काल तू आम्हा सगळ्यांचे आभार मानलेस, तेव्हा भरून आलं होतं. पण मी सुबक आणि कलाकारखाना च्या टीमच्या वतीने तुझे मनापासून आभार मानतो!!! सखी परदेशी जाण्याचा विचार करत होती तेव्हा अमर.. ऐन बहरात होतं. ते पुढे कसं न्यायचं हा आमच्या समोरचा प्रश्न तू सोडवलास, आणि प्रयोगांची घोडदौड देशात-परदेशातही तशीच चालू ठेवलीस. तू एक उत्तम कलाकार आहेसंच, पण एक सहृदयी माणूस सुद्धा आहेस हे जाणवलं!

तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या व अपर्णा कडून आणि अमर.. च्या संपूर्ण टीम कडून अनेक अनेक शुभेच्छा!!!”

‘सुबक’ निर्मित, मनस्विनी लता रवींद्र लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. दरम्यान या नाटकाला प्रेक्षकांनी अमाप प्रतिसाद दिला. त्याच जोरावर हे नाटक इतके वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल

दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा