Tuesday, April 23, 2024

दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

मागच्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. याबाबत तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली होती. त्यानंतर सुश्मिताची सर्जरी देखील झाली. यातून बरी झाल्यानंतर आता ती तिच्या कामावर परतली असून, सध्या सुश्मिता तिच्या आगामी ‘आर्या 3’ ची शूटिंग करत आहे. तिचा या सिरीजच्या सेटवरच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सुश्मिता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. नेहमीच ती विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता देखील तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिला पाहून सर्वच तिच्या प्रेमात पडतील. या व्हिडिओमधील तिचा अंदाज सगळ्यांना भुरळ घालणारा आहे. यात सुश्मिता चक्क तलवारबाजी करताना दिसत आहे. तिने संपूर्ण काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, यात तिचा शानदार अंदाज पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “ती स्वार्थी आहे, निडर आहे, ती पुन्हा आली आहे. आर्या सिझन ३ ची शूटिंग सुरु झाली.”

सुश्मिताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती पूर्णतः फिट दिसत आहे. ती या व्हिडिओमध्ये तिचा तलवारबाजीचे कौशल्य दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये तिने लिहिले, हा तिसऱ्या राउंडचा वेळ आहे.” मागच्या महिन्यात सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिची एंजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या सुश्मिता पूर्णपणे फिट असून, तिने तिच्या आगामी ताली सिनेमाचे डबिंग देखील पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“ती चित्रपटात येते नाचते, मार खाऊन…” कंगना रणौतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ‘या’ अभिनेत्याचे उत्तर आले चर्चेत

उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख मिळवणारी श्रिया पिळगावकर आहे ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री

हे देखील वाचा