मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारून देखील अभिनेत्री राधिका देशपांडेने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. होणार सून मी ह्या घरची, आई कुठे काय करते आदी तुफान गाजलेल्या मालिकांमध्ये काम करत राधिकाने तिच्या अभिनयच ठसा उमटवला. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम लेखिका असणाऱ्या राधिकाच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. तिच्या या पोस्टमधून ती नेहमीच विविध गोष्टींबद्दल अगदी सुंदर लिहिते. तिच्या पोस्टची तर आता नेटकरी आतुरतेने वाट बघत असतात. आता पुन्हा एकदा राधिकाने तिला आलेला एक सुंदर अनुभव अतिशय समर्पक पद्धतीने मांडला आहे.
राधिका नुकतीच नाशिकला जाऊन आली. नाशिकला गेल्यानंतर तिने तेथील प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. मात्र हे दर्शन घेण्यासोबतच तिचा या मंदिरामध्ये जाण्याचा अजून एक उद्देश होता. तोच तिने तिच्या या पोस्टमधून स्पष्ट केला आहे. राधिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ““गेले होते काळा रामाचे दर्शन घ्यायला. पण तिथे खजिनदार भेटले.
View this post on Instagram
डॉ. श्री वैद्य, जगात अशीही माणसं असतात हे माहीत होते पण त्यांचा खजिना त्यांच्या घरी जाऊन बघता येईल, सोन्या चांदीहून अधिक मौल्यवान अशी हस्त लिहीत पुस्तकं, पोथ्या बघता येतील असे वाटले नव्हते. पेटंट असलेले, रेकॉर्ड होल्डर; श्री वैद्य अत्यंत साधे.
इंस्टा वर त्यांची सौ., अश्विनी वैद्य शी ओळख झाली. काळा रामाला भेट द्या. तिथे आमचे ‘ हे‘ पौरोहित्य करतात. अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. मी संपर्क साधला. माऊली नी ओटी भरली, जेवल्याशिवाय पाठवले नाही.
पाटलीपुत्रातले विद्यापीठ मुघलांनी जाळून टाकले हे इतिहास जमा आहे पण श्री वैद्यांसारखे राखणदार वारंवार जन्माला येत असतात. पूर्वजांची मालमत्ता संग्रही ठेवतात आणि संगोपन करतात आणि ही विद्या अधिकाधिक प्रवाहित व्हावी म्हणून हस्तलिखित पोथ्या, पुस्तकं डिजिटलाईज करून घेतात हे आजचे वर्तमान. पुरातन काळातल्या पोथ्यान बद्दल बोलताना त्यांची ओघवती, स्वच्छ आणि सुंदर वाणी ऐकत रहाविशी वाटतं होती. ह फक्त ती समजायला आपल्या बुद्धीवरची धूळ, जळमटं तेवढी साफ करून घ्यावी लागली. आणखीन बरच काही आहे नाशकात. आज एवढेच सांगावेसे वाटते की, अशी माणसं आपण जपली पाहिजेत. धन्यवाद”.”
राधिकाने या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या संग्रही अशा सर्व पुस्तकांची, ग्रंथांची आणि पोथ्यांची मांडणी दिसत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिने हि पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्या आभार व्यक्त केले तर काहींनी तिला अशा लोकांबद्दल अजून लिहीत जाण्याची विनंती केली आहे. दरम्यान राधिका ‘आई कुठे काय करते’ ही मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि खास मैत्रीण म्हणजे देविका हे पात्र साकारताना दिसते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक
अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप