Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप

अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप

सिनेमा, कलाकार आणि सेटवरील किस्से याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. काही किस्से हे पोट धरून हसवणारे असतात, तर काही किस्से ऐकले किंवा वाचल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. असाच एक किस्सा दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याशी संबंधित आहे. हा किस्सा वाचून कदाचित प्रत्येकाच्या भुवया उंचावतील.

अमिताभ यांनी केलेले विनोद खन्ना यांना जखमी
‘महानायक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वत: या किस्साबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले होते. त्यांनी सांगितले होते की, कशाप्रकारे एका सीनची शूटिंग करताना त्यांनी खरोखरच अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांना वाईटरीत्या जखमी केले होते. मात्र, नंतर अमिताभ यांनाही त्यांच्याकडून झालेल्या चुकीची खूपच लाज वाटली होती. वातावरण एवढे तापले होते की, शूटिंगसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. ही घटना एवढी भयानक होती की, कुणालाच कळत नव्हते की, काय केले पाहिजे. हे सर्व पाहून स्वत: अमिताभही खूपच चिंतेत पडले होते. त्यांना वारंवार माफी मागावी लागली होती.

विनोद खन्ना यांना 16 टाके
ही घटना 1978मध्ये रिलीज झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ (Muqaddar Ka Sikandar) या सिनेमादरम्यानची आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना (Amitabh Bachchan And Vinod Khanna) मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती. मात्र, सिनेमातील एक सीन शूट करताना अमिताभ यांच्याकडून अशी चूक झाली होती, ज्यामुळे विनोद खन्ना गंभीर जखमी झाले होते. ही घटना एवढी भयानक होती की, विनोद खन्ना यांना 16 टाके लागले होते.

अमिताभ बच्चन यांनी मागितलेली माफी
खरं तर, या सिनेमातील एका सीनची शूटिंग सुरू होती. त्यामध्ये अमिताभ यांना विनोद खन्ना यांच्यावर काचेचा ग्लास फेकून मारायचा होता. तसेच, विनोद यांना स्वत:चा बचाव करत तिथून बाजूला व्हायचे होते. मात्र, अमिताभ यांनी ग्लास इतक्या वेगाने फेकला की, विनोद यांना स्वत:ला सांभाळण्यासाठी वेळच मिळाला नाही. ते तिथेच उभे राहिले आणि ग्लास थेट त्यांच्या हनुवटीला जाऊन लागला. काही क्षणातच संपूर्ण सेटवर भयाण शांतता पसरली. सर्वजण पाहत राहिले की, नेमकं हे काय घडलं. विनोद यांना एवढी गंबीर दुखापत आली की, त्यांना थेट 16 टाके लागले होते. त्यानंतर ते निशाण त्यांच्या हनुवटीवर कायमसाठी राहिले. या घटनेनंतर अमिताभ वारंवार त्यांची माफी मागत राहिले. कारण, ते या घटनेसाठी स्वत:ला दोषी समजत होते. (vinod khanna got badly injured during muqaddar ka sikandar shooting by amitabh bachchan accidentally hit read here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘या’ दिग्गज संगीतकाराने भर कार्यक्रमात केली पत्नीला मातृभाषेत बोलण्याची विनंती, नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

आनंदाची बातमी! टेलिव्हिजनवरील सुपरहिट मालिका इस प्यार को क्या नाम दूं फेम ‘हा’ अभिनेता झाला बाबा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा