दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, त्याने त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत गुपचूप एंगेजमेंट केली आहे आणि जून महिन्यात तो लग्न बंधनात अडकणार आहे. या बातमीनंतर त्यांच्या लग्नाशी संबंधित माहिती मिळण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. त्याचवेळी आता करणच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. सनी देओलची लाडका घोडी कधी चढणार? चला, तर मग जाणून घेऊया…
देओल कुटुंबाला त्यांचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करणे आवडत नाही, त्यामुळे ते त्यांचे कौटुंबिक कार्य देखील खाजगी पद्धतीने करतात. करणची एंगेजमेंट देखील फक्त कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत झाली आणि आता देओल कुटुंबीय लग्नासाठीही तेच नियोजन करत आहेत. देओल कुटुंबाकडून लग्नाची तारीख आणि विधींबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, माध्यामातील वृत्तानुसार 16 जूनपासून द्रिशा आणि करणच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. आणि 18 जूनला करण लग्न बंधनात अडकणार आहे.
असे म्हटले जात आहे की, हे एक खाजगी लग्न असेल, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र सहभागी होतील. करण मुंबईतच त्याची प्रेयसी द्रीशासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात आता लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.
View this post on Instagram
दुसरीकडे, करणबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 2019मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बाॅलिमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सनी देओलनेच दिग्दर्शित केला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. अशात सनी देओलबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘गदर 2’ हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल दिसणार आहे.(bollywood actor sunny deol son karan deol wedding date revealed know when he will marry to her girlfriend drisha acharya )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅंडशेक करण्यासाठी आलेल्या लेडी फॅनसाेबत करीना कपूरने केले असे ‘कृत्य’, अभिनेत्रीची वागणूक पाहून चाहते थक्क
‘या’ चित्रपट निर्मात्यानं सलमान अन् आमिरवर केला माेठा आराेप; म्हणाला, ‘या दोघांमुळे माझा चित्रपट…’