Sunday, May 19, 2024

जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

छोट्या पडद्यावर असे अनेक शो आहेत, जे आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करतात. यामध्ये समावेश होतो, तो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’चा. या शोमध्ये अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. तसेच, त्यांच्या आयुष्यातील, पडद्यावरील चांगले- वाईट किस्से शेअर करत असतात. अशातच आता बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल आपल्या मुलासोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये झळकणार आहे. या वीकेंडला तो सर्वांसोबत मिळून मजा- मस्ती करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सनी त्या आठवणी ताज्या करताना दिसत आहे, जेव्हा करण आपल्या वडिलांना जुही चावलासोबत रोमान्स पाहून भावुक झाला होता.

कपिलने विचारला ‘हा’ प्रश्न
कपिल शर्माने सनी देओलला विचारले की, त्याचे वडील धर्मेंद्र आणि मोठा मुलगा करण यांच्यासमोर रोमँटिक सीन करताना तो किती सहजसोपा वाटतो. यावर सनी देओल म्हणतो की, “जेव्हा मी जुही चावलासोबत शूटिंग करत होतो, तेव्हा करण लहान होता. एका दृश्यात मी जुहीला मिठी मारली. तो एका गाण्याचा क्रम होता. करण माझ्या मागे माझ्या चुलत भावाच्या मांडीवर होता. ते दृश्य पाहून करण जोरात रडायला लागला.” (Sunny Deol Reveals Son Karan Deol Cried After Watching Romantic Scene With Juhi Chawla)

सनी देओल आणि करण देओल दोघेही ‘वेले’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. अजय देवगण निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेन मुंजाल यांनी केले आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 10 डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करण देओलसोबत अभय देओलही दिसणार आहे. अभय बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, या चित्रपटाद्वारे तो पुनरागमन करत आहे.

याशिवाय सनी देओलने त्याचा आगामी चित्रपट ‘गदर 2’ चे शूटिंग सुरू केले आहे. अलीकडेच अमीषा पटेलने सेटवरील फोटो शेअर केले होता, ज्यामध्ये सनी देओल, तारा सिंग आणि अमिषा पटेल सकीनाच्या भूमिकेत दिसत होते. चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेशात सुरू आहे. यावेळी तेथे लष्कराचे जनरलही उपस्थित होते.

सनी देओलच्या शेवटच्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर तो ‘ब्लँक’ या चित्रपटात झळकला होता. विशेष म्हणजे, सनी देओलव्यतिरिक्त त्याचा मुलगा करण देओलही अभिनेता आहे. तो ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातही झळकला आहे. याव्यतिरिक्त तो अनेक म्युझिक व्हिडिओतही दिसला आहे.(sunny deol reveals son karan deol cried after watching romantic scene with juhi chawla)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रिया सरनने फ्लॉन्ट केला सोज्वळ लुक, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल.

तापसी पन्नू शाहरुखसोबत जाणार सौदी अरेबियाला? जाणून घ्या किंग खानचा प्लान

हे देखील वाचा