Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड “मी ज्या कलाकारांसोबत काम केले त्या सर्वांसोबत…” प्रियांका चोप्राने केले तिच्या एक्स रिलेशशीपबद्दल मोठे वक्तव्य

“मी ज्या कलाकारांसोबत काम केले त्या सर्वांसोबत…” प्रियांका चोप्राने केले तिच्या एक्स रिलेशशीपबद्दल मोठे वक्तव्य

प्रियांका चोप्रा नेहमीच या ना त्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये गाजत असते. सध्या ती तिच्या प्रदर्शित झालेल्या आणि तुफान गाजत असलेल्या ‘सिटाडेल’ सिरीजमुळे कमालीची गाजत आहे. मात्र यासोबतच ती तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे केलेल्या वक्तव्यामुळे देखील चांगलीच लाइमलाईट्मधे आली आहे. नुकतीच प्रियांका ऐलेक्स कूपरच्या पॉडकास्ट असलेल्या ‘कॉल हर डॅडी’मध्ये पोहचली होती. यावेळी तिने अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा केली.

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये नावलौकिक मिळवणारी प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमी दिसत आहे. बॉलिवूडमध्ये तिला चित्रपट मिळणे कमी झाल्यानंतर ती हॉलिवूडमध्ये गेली. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या माजी प्रियकरांबद्दल भाष्य केले आहे.

यावेळी प्रियांका म्हणाली, “मी एक सिरीयल ‘मोनोगॅमिस्ट’ आहे. मी एका पाठोपाठ एक सतत वेगवेगळ्या नात्यात राहिले. नेत्यानी ब्रेकअप नंतर मी गॅप ठेवला नाही. एवढेच नाही तर मी स्वतःला देखील वेळ दिला नाही. मी ज्या कलाकारांसोबत काम केले त्या सर्वांसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. मला माहीत होते की एक नाते कसे असावे. मी लोकांना माझ्या कल्पनेच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करत गेली. मी ज्यांना डेट केले ते सर्वच खूप चांगले होते.”

प्रियंकाने पुढे निक आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले, “निक माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी ज्या नात्यात होती त्यात मला हरवल्यासारखे वाटत होते. निकसोबत लग्न करण्यापूर्वी मी दोन वर्षांचा ब्रेक घेतला आणि नेहमी मी माझ्या रिलेशनशिपमध्ये कोणत्या चुका केल्या त्यावर अवलोकन केले. तेव्हा मला हे जाणवले की, जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही समजून घेत नाही.”

प्रियांका चोप्राचे नाव बॉलीवूडमधील अक्षय कुमार, शाहरुख खान, हरमन बावेजा आणि शाहिद कपूर आदी कलाकारांसोबत जोडले गेले होते. त्यानंतर तिने २०१८ साली हॉलीवूडस्टार निक जोनाससोबत लग्न केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावे ते नवलच! वयाच्या ७९ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता सातव्यांदा झाला बाबा, स्वतःच केला खुलासा

आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

हे देखील वाचा