मागील बऱ्याच काळापासून तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका सतत विविध कारणांमुळे किंबहुना नकारात्मक बातम्यांमुळे सतत गाजत आहे. आधी शैलेश लोढा यांच्या आरोपांमुळे आणि केसमुळे तर आता अभिनेत्री जेनिफर मिस्त्रींच्या लैंगिक शोषणाच्या मोठ्या आरोपामुळे गाजत आहे. जेनिफरने असित मोदी आणि त्यांच्या टीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे ती कमालीची गाजत आहे. मात्र याआधी देखील तिने तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सांगितलं होता.
एका व्हिडिओमध्ये जेनिफरने सांगितले होते की, ती कास्टिंग काऊचचा शिकार झाली आहे.तिने सांगितले की तिला कास्टिंग एजेंटकडून काय काय ऐकावे लागायचे. जेनिफरने सांगितले होते की, “तू कोणाला सांगू नकोस की, तू विवाहित आहेस. तू कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. तू सगळ्यांना सांगतेस का की तू विवाहित आहेस. असे असेल तर तुला कधीच यश मिळणार नाही. तुला काही दुसरेच करावे लागेल. मी तुला संधी देईल, मात्र तुला थोडे निर्मात्यांसोबत फिरावे लागेल.”
पुढे जेनिफरने सांगितले होते की, “एकदा मला एका साऊथ इंडियन निर्मात्याने चित्रपटात काम देण्याच्या कारणाने एका हॉटेलमध्ये बोलावले आणि त्याच्या सोबत फिरण्याचे सांगितले. मला त्याचे बोलणे खटकत होते आणि काही योग्य वाटत नव्हते. त्यानंतर मी तिथून पळून गेले.”
दरम्यान जेनिफर मिस्त्रीने मार्च २०२३ मध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका सोडली आहे. तिने निर्मात्यांवर असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून, त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागिनसारखं डाेलत उर्फीने केला डान्स; युजर्स म्हणाले, ‘आ गई जंगली कहीं की…’
तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट