महाराष्ट्रातल्या चौकाचौकात ज्या चित्रपटाची चर्चा आहे, अशा ‘चौक‘ या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. काही तांत्रिक कारणांमुळे हा चित्रपट 19 मे ऐवजी, 2 जूनला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात 2 जूनला प्रेक्षकांची प्रतिक्षा संपवण्यासाठी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शत हाेणार आहे.
‘चौक’ या मल्टिस्टारर चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आणि समाजातील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला शुभेच्छा देत, हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघण्याचे आवाहन केले आहे. या चित्रपटातील गाणी, चपटीत संवाद आणि थिरकायला लावणारं संगीत यांमुळे चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे रिल्स, संवादांचे रिल्स तरूणाईच्या स्टेटसवर दिसत आहेत.
‘चौक’मध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, अंजली जोगळेकर, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड अशी कलाकारमंडळी आहेत. तर दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची विशेष भूमिका आहे. अनुराधा प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि दिलीप (तात्या) लालासाहेब पाटील निर्मित ‘चौक’ हा चित्रपट 2 जूनला महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होईल. (Due to technical difficulties, the release of the film ‘Chauk’ has been changed, the film will be released on ‘this’ date)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दिल तुम्हारा हो गया” या ‘अनलॉक जिंदगी’मधील गाण्यातून व्यक्त होणार मनातील ‘त्या’ हळुवार भावना
मराठमोळ्या तोऱ्यात रिंकू राजगुरूने चालवली गाडी, व्हिडिओ व्हायरल